#देखावा : वेस्टर्न सिडनी : गणपती उस्तव २०१७!

0

राठी माणूस हा मुळातच उत्सव प्रिय! संक्रात, होळी, दसरा, दिवाळी आणि सगळयांच्या उत्सवाला उधाण येणारा सण म्हणजे गणपती बाप्पा. उत्सवमूर्तीच प्रत्यक्ष. जगाच्या पाठिवर कोठेही मराठी माणूस असो गणपती येणार म्हणजे आनंदी आनंद असेच एकदा आमच्या सिडनीमधल्या चार मित्रांनी श्री बाणोडकर, श्री. दलाल, श्री. कुलकर्णी आणि श्री. मांजरेकर यांनी वेस्टर्न सिडनीमध्ये सार्वजनिक उत्सवाचा श्रीगणेेशा केला आणि बघता बघता 11 वर्षे झाली सुध्दा !

गेली 11 वर्षे गणपती बाप्पा सिडनीवासियांना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या दणक्यात येतात. आणि 2015 पासून तर गणपती बाप्पाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात होत आहे. मग दहा दिवस आरती, प्रसाद, एक दिवस अर्थवशिर्षाचे पारायण एक दिवस प्रश्‍नमंजुषा, एक दिवस विविध गुणदर्शन दहा दिवस आनंदी आनंद. 

अरे हो, गणपती म्हणाल की मक्खर सजावट आलीच आणि ह्या वर्षी आमच्या वेस्टर्न सिडनी गणपतीच्या सजावटी मागे एक वेगळी कल्पना होती बर का! हल्ली लहणापासुन मोठ्यापर्यंत सगळे कोठेही असोत फेसबुकनी एकमेकांना जोडले आहेत. मग आमचे बप्पा तर बुध्दीचे दैवत त्यांनी पण नविन टेकन्लॉॅजी केव्हाच आत्मसात केली. आम्ही मनानी तर बप्पाशी कनेेक्टेड आहोतच. पण आज आम्ही फेसबुकवर सुध्दा बाप्पाशी फ्रेंडशीप केली आहे. अगदी बरोबर आमची ह्या वर्षाची सजावट फेसबुकचे पान. त्यामुळे लहान मुले, तरूण मुले ही जास्त उत्साहानी भाग घेतील असा विचार होता.

अरे हो, अजुन एक महत्वाचं वेस्टर्न सिडनी गणेशोत्सव वर्गणीतून समाजिक कार्याला सुध्दा हातभार लावायाचा प्रयत्न करतात. सार्वजनिक उत्साहातून सार्वजनिक कार्याला थोडी खारीची मदत झाली तर बप्पा नक्किच खुष होतील ना!

(लेखक : सुनील बरभाई, शिवगर्जना सिडनी ढोल ताशा पथक, वेस्टर्न सिडनी, ऑस्ट्रेलिया)

LEAVE A REPLY

*