Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

पश्चिम आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धा : नाशिकची सृष्टी रांका चमकली

Share

नाशिक | प्रतिनिधी 

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या वतीने, जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या (फिडे) मान्यतेने व दिल्ली बुद्धिबळ संघटनेतर्फे  6 ते 10 सप्टेंबर दरम्यान दिल्ली येथे झालेल्या  पश्चिम आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत सृष्टी जयदीप रांका हिने अतिशय दिमाखदार खेळाचे प्रदर्शन केले.

तिच्या या कामगिरीमुळे तिच्या गुणांकनात 114 गुणांची भर घातली आहे. एकाच स्पर्धेत एवढे गुणांकन वाढवणे ही एक चांगली कामगिरी मानली जाते. तसेच या कठीण स्पर्धेत पहिल्या 20 खेळाडुंमध्ये स्थान मिळविले.

सृष्टी 14 वर्षाखालील मुलींच्या गटात खेळली. या स्पर्धेत तिने आशियाई पातळीवर पदक जिंकलेल्या तनिशा बोरमणिकरला (आंतरराष्ट्रीय रेटिंग 1661) पराभूत केले. तर आठव्या फेरीत तिने शिविका रोहिला (आंतरराष्ट्रीय रेटिंग 1780)  हिच्याशी चांगला खेळ करून बरोबरी साधली.  या स्पर्धेत भारतासह उझ्बेकिस्तान, कझाकिस्तान, श्रीलंका, सयुंक्त अरब अमीरत असे एकूण 10 देशांचे निवडक खेळाडू सहभागी झाले होते.

स्पर्धेत तिने 9 सामन्यात 4.5 गुण मिळविले. त्यात 3 विजय, 3 पराजय व 3 सामने तिने बरोबरीत सोडवले. सृष्टीच्या गटात एकूण 37 खेळाडू होते त्यातील 36 खेळाडू आंतरराष्ट्रीय मानांकीत आहेत.

त्यात तिला सृष्टीला 26 वे मानांकन होते. परंतु तिने अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली.  सृष्टीचे विशेष म्हणजे ती सर्व सामने तिच्यापेक्षा जास्त गुणांकन असलेल्या खेळाडूबरोबर खेळली व त्यात चांगली कामगिरी केली. सृष्टी न्यू इरा शाळेच्या 9 वीच्या वर्गात शिकत आहे. तिने या स्पर्धेतील उजवल कामगिरीच्या आधारे नाशिकचे नाव उंच केले आहे.

नाशिकचे राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक विनोद भागवत यांच्याकडून सृष्टी मागील दोन वर्षापासून प्रगत बुद्धिबळाचे धडे गिरवत आहे. मागील वर्षी तिने महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवून राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतही उत्तुंग कामगिरी केली होती.  सृष्टीला सुरूवातीचे प्रशिक्षण मंगेश गंभिरे, ओंकार जाधव, सुनील शर्मा यांच्याकडे मिळाले आहे जे तिच्यासाठी फायदेशीर ठरले. तसेच डॉक्टर सचिन व्यवहारे यासह सर्वच प्रशिक्षकाचे तिला सहकार्य मिळाले आहे.

त्याचप्रमाणे तिच्या पालकांनी अतिशय सकारात्मक दृष्टीकोण ठेवल्यामुळेच सृष्टीला एवढी मजल मारता आली. तिच्या या यशाबद्दल सर्व क्रीडाप्रेमीनी तिचे कौतुक केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!