Type to search

आवर्जून वाचाच क्रीडा मुख्य बातम्या

भारत-विंडीज दुसरा टी-20 सामना आज रंगणार

Share

लखनऊ : वेस्ट इंडिज संघाच्या पराभवांचे दुष्टचक्र काही थांबायचे नावच घेत नाही. कसोटी, वनडे मालिका त्यांनी गमावल्याच, पण त्यांच्यासाठी टी-२० मालिकेची सुरुवातही साजेशी झाली नाही. हाच सिलसिला मंगळवारी रंगणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या टी-२०मध्येही कायम राहील असे दिसते आहे. इथेही यजमान भारतीय संघ संभाव्य विजयी संघ समजला जातो आहे.

दुसरीकडे यजमानांवर पटलवार करून तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान राखण्याच्या इराद्याने विंडीज संघ मैदानावर उतरेल. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ३१ वर्षांचा रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करतो आहे. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. आता लखनौमध्ये तो त्याची भरपाई करण्यासाठी उत्सुक असेल. रोहितप्रमाणेच शिखर धवन, लोकेश राहुल, रिषभ पंत व मनीष पांडे हेही सलामीच्या लढतीत आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करू शकले नाहीत. यातील आज कोण संधीचे सोने करतो ते पाहणे रंजक ठरेल.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शाहबाझ नदीम.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!