रसदार रसगुल्ला कोणाचा? या वादात पश्चिम बंगालचा विजय

0

नवी दिल्ली, ता. १४ : रसदार गोड रसगुल्ला नक्की कोणत्या प्रांताचा? ओरिसाचा की पश्चिम बंगालचा या प्रश्नाचे उत्तर आहे पश्चिम बंगालचा.

चेन्नईच्या जिओग्राफीक इंडिकेशन रजिस्ट्रेशन विभागाने रसगुल्ला ही बंगाल प्रांताचीच भौगोलिक ओळख असल्याचे आता स्पष्ट केले आहे.

हा पदार्थ नक्की कोणत्या प्रांताची ओळख यावर २०१५ पासून ओरिसा आणि प. बंगालमध्ये वाद विवाद सुरू होते.

ओरिसाच्या एका मंत्र्याने म्हटले होते की रसगुल्ला ६०० वर्षांपासून राज्यात तयार होत आला आहे. तर १८६८ मध्ये नबीनचंद्र दास यांनी हा पदार्थ सर्वप्रथम तयार केला असल्याचा दावा प. बंगालने केला होता.

त्याचवेळी ओरिसाने इतिहास संशोधनाच्या आधारे हा पदार्थ सर्वप्रथम राज्यातील पुरी शहरात खीर मोहनच्या रूपात तयार झाला असल्याचा दावा केला होता.

या सर्व वादविवादानंतर चेन्नईच्या भौगोलिक निर्देशांक विभागाने आपले मत प.बंगालच्या पारड्यात टाकत रसगुल्ला ही प. बंगालची भौगोलिक ओळख असल्याचे जाहीर केले.

दिवाळीसाठी खास पाककृती – रसगुल्ला

LEAVE A REPLY

*