पश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना

0
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये आणखी पूल कोसळला आहे. ही घटना आज सकाळी सिलीगुडी भागात घडली आहे. गेल्या आठवडाभरातील पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. पूल कोसळल्यामुळे पुलावर एक टेंपो गाडी अडकून पडली आहे. तसेच काही लोक अडकून पडले असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या मंगळवारी दक्षिण कोलकाता भागात एक पूल कोसळला होता. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू आणि २५ लोक जखमी झाले होते. आता पुन्हा आणखी एक पूल कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

*