कोल्हापूर-शिर्डी दिंडीचे अस्तगाव माथ्यावर स्वागत

0
अस्तगाव (वार्ताहर)- शिस्तबध्द दिंडी अशी ख्याती असलेल्या कोल्हापूर ते शिर्डी या साईबाबांच्या दिंडीचे अस्तगाव माथ्यावर जोरदार स्वागत करण्यात आले. या दिंडीने येथे मुक्कामही केला.
गेल्या 21 वर्षांपासून साईबाबांची दिंडी कोल्हापूर ते शिर्डी अशी येते.
तेथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने या दिंडीचे आयोजन केले जाते. या दिंडीत 580 स्त्रिया, 170 पुरुषांचा समावेश होता. या दिंडीतील स्त्रियांनी भगवी साडी, भगवी टोपी व हातात झेंडा घेत या दिंडीत सहभाग घेतला. तर पुरुष भक्तांनी पांढरा पोषाख करत शिस्तीने, रांगेने या दिंडीत सहभाग घेतला.
या दिंडीचे अस्तगाव माथ्यावरील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या आबासाहेब नळे यांच्या साईइंद्रता लॉन्स येथे मुक्काम केला. यावेळी श्री. नळे यांनी सर्व पदयात्रींसाठी भोजन दिले. या दिंडीचे स्वागत जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.
यावेळी सभापती हिराबाई कातोरे, उपसभापती बबलू म्हस्के, माजी सभापती निवास त्रिभुवन, सदस्या शोभा जेजूरकर, उपसभापती वाल्मिक गोर्डे, अशोक नळे, सदस्या अरुणा नळे, सोसायटीच्या उपाध्यक्षा अनिता नळे, नानसाहेब चोळके, भानुदास गवांदे, विपुल गवांदे, अनिल नळे, नवनाथ नळे, अंबादास लोंढे आदींसह नळे कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील मान्यवरांनी तसेच अस्तगाव ग्रामस्थांनी सत्कार केला. दिंडीच्यावतीने साईइंद्रता लॉन्सचे आबासाहेब नळे यांचा महालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

*