दप्तराचे ओझे वाढल्यास मुख्याध्यापकच जबाबरदार

0

शिक्षणाधिकार्‍यांना करावी लागणार तपासणी 

अहमदनगर (प्रतिनिधी) – दप्तराच्या ओेझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका होण्यासाठी शाळा स्तरावरून सर्वंकष प्रयत्न करण्यात यावेत असे स्पष्ट करतानाच नियामक मंडळाने नामनिर्देशित केलेल्या एका संचालकांना व शाळेच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल, असे शालेय विभागाने स्पष्ट केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सूचविण्यात आलेल्या आहेत. शैक्षणिक सत्र 2017-18 च्या प्रत्येक महिन्यामध्ये प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाने विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी करावी व त्यांनी त्यांचा अहवाल दिल्यानंतर शिक्षण संचालकांनी यासंदर्भातील आवश्यक त्या सूचना क्षेत्रीय अधिकार्‍यांना देण्यात याव्यात.
तसेच सर्व क्षेत्रिय अधिकार्‍यांनी सूचना सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहचतील याची खातरजमा करावी. दप्तराच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका होण्यासाठी शाळा स्तरावरून सर्वंकष प्रयत्न करण्यात यावेत यात कसूर झाल्यास नियामक मंडळाने नामनिर्देशित केलेल्या एका संचालकास व शाळेच्या मुख्याध्यापकास जबाबदार धरण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*