‘राधे मां’ च्या वेब सिरीजचा ट्रेलर लाँच

0
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वेब सिरीजची लोकप्रियता वाढते आहे. प्रेक्षकांकडून देखील मोठी पसंती मिळते आहे. वेगवेगळ्या विषयांवर आता वेब सिरीज निर्माण केल्या जात आहेत. प्रत्येक वेब सिरीज आता इंटरनेटवर उपलब्ध झाली आहे. बॉलिवूड मधील कलाकार देखील यामध्ये झळकू लागले आहे. परंतु आता सगळ्यांना धक्का देणाऱ्या विषयावर ‘राधे मां’ वर लवकरच आधारित वेब सिरीज ‘राह दे मां’ नावाची वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.

या वेब सिरीजमधून आपण स्वतः देव असल्याचा दावा करणारी राधे मां अभिनयात डेब्यू करत आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर देखील अत्यंत बोल्ड आहे. तसेच या वेब सिरीज मधून प्रेक्षकांना अनेक बोल्ड सिन पाहायला मिळणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच दोन मुलींचा किसिंग सीन पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमधून स्पष्ट होतंय की ही वेब सिरीज युवांकरता आहे. या वेब सिरीजमधून राधे मां आपल्या भक्तांना चांगला मार्ग दाखवत आहे.

LEAVE A REPLY

*