‘पद्मावती’ वाद : अभिनेत्री दीपिका पदुकोणला करणी सेनेची धमकी

0

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाला देशभरातून विरोध होताना दिसत आहे.

पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाला तर या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाक कापून टाकू, अशी धमकी करणी सेनेने दिली आहे.

करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र नाथ यांनी आज लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. पद्मावती हा चित्रपट हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

तसेच, या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाक कापण्याची जाहीर धमकी सुद्धा त्यांनी यावेळी दिली.

1 डिसेंबर 2017 रोजी पद्मावती चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*