Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : चांद्रयान 2 चे सिग्नल मिळतील…शिक्षकांसह विद्यार्थ्यांना आशा

Share

संपुर्ण देश शास्त्रज्ञांच्या पाठिशी

नाशिक । प्रतिनिधी

भारताच्या ’चांद्रयान 2’च्या विक्रम मून लँडरशी चंद्रभूमीपासून दोन किलोमीटरवर असताना संपर्क तुटला. यामूळे ही मोहीम पुर्ण होऊ शकली नाही. संपर्क तुटला असला तरी अजूनही आशा मावळल्या नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून आरवायके महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची नजर या मोहीमेकडे होती. या विद्यार्थी आणि शिक्षकांशी देशदूत डिजिटने संवाद साधला.

एचपीटी आणि आरवायके महाविद्यालयाच्या सेमीनार हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य व्हि. एन.सुर्यवंशी, भौतिकशास्त्र विभागाचे एसएम शिंपी यांच्यासह इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

रात्री जवळपास सर्वच विद्यार्थी या मोहिमेचे प्रक्षेपण बघत होते. विद्यार्थ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी अचूकपणे काम केले आहे. अगदी थोड्यावरून ही मोहीम पुर्ण होऊ शकली नाही. परंतू, अजूनही आशा सोडल्या नाहीयेत. पुढे काही सिग्नल मिळतील. अशी आशा येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे या मोहिमेत मोठे योगदान आहे त्यांच्या पाठिमागे संपुर्ण देश उभा राहिला आहे.


चांद्रयाण मोहिम अत्यंत प्रभाविपने इस्त्रोच्या शास्त्राज्ञांनी राबविली आहे. यात अनेक नवनवीन कल्पना पहिल्यांदाच वापरल्या गेल्या. शास्त्रज्ञांची पुर्वतयारी खुप चांगली होती. जिथे कुठे चांद्रयाण उतरेल तिथे प्रचंड धुळ उडेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. कदाचित ही धुळ अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात असेल. त्यामूळेही संपर्क तुटला असावा त्यामूळे काही वेळाने सिग्नल मिळण्याची दाट शक्यता आहे.

व्ही. एन. सुर्यवंशी, प्राचार्य, एचपीटी अ‍ॅण्ड आरवायके महाविद्यालय


अपयश ही यशाची पहिली पायरी असते. इस्त्रोच्या पुढील कार्यासाठीही शुभेच्छा. इस्त्रोचे शास्त्रज्ञ मजल दरमजल करत नक्की यशस्वी होतील.

एस. एम. शिंपी, असोसिएट प्रोफेसर भौतिकशास्त्र विभाग


संपर्क तुटला असेल तरीही सिग्नल येतील याची वाट पाहतो आहोत. लवकरच सिग्नल मिळतील अशी आशा आहे.

कनक घोडके, विद्यार्थी

———————————————————————————————————————————————————-

#Chandrayan2, We Indians are absolutely proud of the heroics displayed by ISRO. We stand with our heads high for getting so close where the other space organisations didn’t even dream of. ISRO has motivated many youngsters of fighting the battle till the last sword. We have learnt so many things during the telecast of this episode. I applaud and wish ISRO all the success in its future Missions. Dr. Sivan your team’s efforts of so many years is commendable and have made us proud as Indians.
Jai Hind 🇮🇳
– Ravindra Gudi


जरी इस्त्रोचे विक्रम लँडर लँड झालं नाही, तरीही ते चंद्राच्या कक्षेत गेले आहे. चंद्राच्या कक्षेतून महिनाभर आपल्याला फोटो येणार आहेत. क्रिकेट मॅचला जागणारे देशवासिय काल इस्त्रोच्या कार्याच्या गौरवासाठी रात्रभर टीव्हीसमोर होते याचा अधिक आनंद.

लौकीक रावळ, विद्यार्थी


चांद्रयाण 2 मोहिमेत ऑरबॅटरशी संपर्क होत आहे. त्यांचा संपर्क लँडरसोबतही होतोय. त्यामूळे प्रामुख्याने साऊथ पोलवरची माहिती आपणांस मिळू शकते.

श्वेता गाडेकर, विद्यार्थीनी


इस्त्रोच्या चांद्रयाण 2 मोहिमेकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून होते. ऑरबॅटरचे काम सुरु झाले आहे. ही मोहीम 95 टक्के पुर्ण झाली आहे. आपण जे गमावलं ते फक्त पाच टक्के किंवा त्यापेक्षाही कमी आहे. अजूनही संपर्क होईल अशी आशा आहे.

वैशाली भावले, विद्यार्थीनी


विक्रम लँडरचा संपर्क तुटला आहे. मात्र, येणार्‍या काळात सिग्नल मिळण्याची दाट शक्यता आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरु आहेत सिग्नल मिळतील अशी आशा आहे.

पंकज भड, विद्यार्थी


इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांनतर चांद्रयाण 2 यशस्वी होण्याकडे वाटचाल करत होती. मात्र, अखेरचे दोन किलोमीटर शिल्लक असताना संपर्क तुटला मात्र, विक्रम लँडरने काम सुरुदेखील केले असेल. आशा अजून संपल्या नाहीत नक्कीच संपर्क होईल.

त्रिलोक कुमावत, विद्यार्थी. 


चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जगात पहिला देश भारत चंद्रयान- 2 पाठवणारे ठरले. यापूर्वी चार देशांनी पाठवलेले यान चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचले होते, आता भारतानेही ही कामगिरी करून दाखविली असल्याने करोडो भारतीयांची मने इस्रोने जिंकली आहे.

-विशाल राठोड


अंतराळ मोहिमांमध्ये जोखीमही तितकीच महत्वपुर्ण असते चार महिन्यांपूर्वीच इस्त्राईल सारख्या प्रगत राष्ट्राची चांद्रयान मोहीम असफल झाली त्या आधी नासाचे देखील अनेक प्रयोग अयशस्वी ठरले परंतु अंतराळातील संशोधन आणि प्रयोग ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे इस्त्रो पुढील काळात नक्की यशस्वी होईल.

-प्रसाद देशमुख


संपूर्ण भारताचे लक्ष लागून असलेल्या विक्रम लँडरशी 2. 1 किमीवर संपर्क तुटला. पण शास्त्रज्ञांनी उत्तम कामगिरी केली आहे. आपला फक्त संपर्क तुटलाय प्रयत्न केले तर नक्कीच सकारात्मक घडू शकते, त्यामुळे आपण आपल्या अपेक्षा सोडायला नको.

-पूनम भालेराव

विज्ञाना मध्ये निरनिराळे प्रयोग होतच असतात त्याशिवाय यश मिळत नाही. या मधूनच जगासमोर नवीन माहिती येते. एखाद्या प्रयोगामध्ये कमी प्रमाणात यश मिळू शकते. चंद्रयान 2 मोहीम राबवून भारतीय शास्त्रज्ञांनी त्यांचे धाडस आणि कर्तृत्व सिद्ध केले आहे. इस्रोची कामगिरी कौतुकास्पद असून संपूर्ण देश तुमचा सोबत आहे.

-किरण मोरे, गर्जा महाराष्ट्र फौंडेशन,नाशिक


संपूर्ण भारताचा चंद्रयान 2 कडे लक्ष असताना अचानक पणे अडचणी निर्माण झाल्याने संपर्क तुटल्याची बातमी मिळताच सगळीकडे नाराजी निर्माण झाली तरीही याचा अर्थ असा होत नाही की आपले प्रयत्न अपयशी ठरले या नंतर प्रयत्न केले तर नक्कीच यशस्वी ठरतील याची खात्री संपूर्ण भारताला आहे.

-अश्विनी राठोड


भारतीय इस्रोने केलेली कामगिरी हि खरच कौतुकास्पद आहे. चंद्रयान 2 ला आलेल्या अडचणी मुळे आपले प्रयत्न अपयशी ठरले असे नाही म्हणता येणार कारण आपला केवळ संपर्क तुटला आहे संकल्प नाही.

-नंदिनी खंडारे


इस्रोने केलेल्या या कामगिरीचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. आपल्या शास्त्रज्ञांचे हे योगदान युवापिढी साठी कायमच आदर्श राहील. यश अपयश हे तर चालूच असत पण प्रयत्न करत राहणे आपल्या हातात आहे, हेच इस्रोने दाखवून दिले.

-विकास शिरसाठ. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!