Type to search

जळगाव

जलयुक्त शिवाराची कामे शेतीला वरदान

Share

वावडे ता.अमळनेर (वार्ताहर) – आपली शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने योग्य नियोजन केल्यास जलयुक्त शिवाराची माध्यमाने पाण्याचे नियोजन करून शेतीला पाणी उपलब्ध होऊ शकते. यावर्षी या परिसरातील मांडळ सह इतर गावांत जलयुक्त शिवारातील तिसऱ्या टप्प्यात नाला खोलीकरण, बाध बंदिस्त तसेच लोणसीम शिवारात नाला खोलीकरण, बाध बंदिस्त, जि प लघु सिंचन विभागा मार्फत पाझर तलाव इ कामे लक्ष देऊन करण्यात आली त्या परिसरातील शेत शिवाराला व शेतकरी वर्गाला पुरेपूर फायदा होत आहे.

सुरवातीला या परिसरात जून जुलै कोरडे गेली. पिके जडून गेली परंतु गेल्या दोन दिवसातील पडणाऱ्या या पाण्याने जलयुक्तशिवारच्या झालेल्या कामांचा फायदा शेतकरी वर्गाला निश्चितच होणार असल्याचे दिसत आहे .नाला व विहीर भरून त्या साठलेल्या पाण्याचा शेतकरी वर्गाला पुरेपूर फायदा होणार आहे. या कामी तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी वेळोवेळी कामावरती चौकशी करून निधी उपलब्ध केला. उपविभागीय अधिकारी जाधवर, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मंडळ अधिकारी प्रदीप निकम, अविनाश खैरनार,यांचे मार्गदर्शन खाली श्री बालाजी घुगे , राजेश बोरसे सतिश वानखेडे इत्यादी नी कामावरती देखभाल केली होती.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!