दारणात 70 तर गंगापूरमध्ये 124 दलघफू नवीन पाणी

0
अस्तगाव (वार्ताहर)- दारणा तसेच गंगापूरच्या पाणलोटात शनिवारी दिवसभर पडलेल्या धुव्वाधार पावसाने दारणात 70 दशलक्ष घनफूट, गंगापूर धरणात मध्ये 124 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले आहे.
दारणाच्या पाणलोटातील घोटी येथे 24 तासांत 164 मिमी, इगतपुरी येथे 220 मिमी पावसाची नोंद झाल्याने या हंगामात पहिल्यांदाच दारणात नवीन पाणी दाखल होऊ लागले आहे.
7149 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात 145 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. त्यात 70 दशलक्ष घनफूटाने वाढ हाऊन तो 255 वर पोहचला आहे. दारणाच्या भिंतीजवळही 84 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणाच्या पश्‍चिमेकडील भावली धरण परिसरात 193 मिमी पाऊस झाला. या धरणात उपयुक्त साठा शुन्य होता. त्यात नवीन पाण्याची आवक झाल्याने तो 137 दशलक्ष घनफूट इतका झाला आहे.
गंगापूर धरणाच्या परिसरातही मुसळधार पाऊस झाला. 173 मिमी पावसाची नोंद झाली. तर पाणलोटातील आंबोली येथे 96, त्रंबक येथे 148 मिमी पाऊस झाला. त्यामुळे गंगापुरचा साठा 1118 वरुन तो 1242 इतका झाला आहे. त्यात 124 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. या व्यतिरिक्त आळंदी धरणात 11 दशलक्ष घनफूट, वालदेवीत 14 दशलक्ष घनफूट, गौतमी गोदावरीत 33 दशलक्ष घनफूट, काश्यपीत 90 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे.
काल सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांत नोंदलेला पाऊस (मिलीमिटर मध्ये)असा- मधमेश्‍वर 7, देवगाव 2, ब्राम्हणगाव 1, सोमठाणा 8,सोनेवाडी 4, शिर्डी 3, राहाता 11 (एकुण 410), रांजणगाव 5, कडवा 95, मुकणे 95, काश्यपी 70, गौतमी 56 असा पाऊस नोंदला आहे. काल रविवारी पावसाळी वातावरण होते. मात्र पावसाने विश्रांती घेतली होती.

कुकडी प्रकल्पात 434 दलघफू पाणी दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- कुकडी समूह धरण पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने या समूहात प्रथम विक्रमी 434 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला आहे. काल सायंकाळी या समूहातील पाणीसाठी 1039 दलघफू झाला होता. या पाणलोटात मोठ्या पावसाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. गत दोन दिवसांपासून या भागात मान्सून सक्रिय झाला नि जोरदार पाऊस सुरू झाला. परिणामी या धरण समूहात पाण्याची आवक होऊ लागली. येडगाव पाणलोटात 70, माणिकडोह 94, वडज 77, पिंपळगाव जोग 73 तर डिंभे 96 मिमी पाऊस झाला. त्यामुळे पुणे आणि नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*