Type to search

Featured सार्वमत

ऐन टंचाईच्या काळात नगरमध्ये 10 लाख लिटर पाणी वाया

Share
अहमदनगर (प्रतिनिधी)- आगरकरमळा परिसरात रविवारी सकाळी 8 च्या सुमारास महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेवरील पाण्याच्या टाकीचा वॉल नादुरुस्त झाल्याने दहा लाख लीटर पाणी रस्त्यावर सोडून देण्याची वेळ आली आहे. ऐन उन्हाच्या तडाख्यात पाणी रस्त्यावर सोडण्यात आल्याने अनेकांनी आपली वाहने धुवून घेतली. पाण्याच्या टाकीचा वॉल दुरूस्त करण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने मनपा पाणी पुरवठा विभागाला हे पाणी परिसारात रस्त्यावर सोडावे लागले.

आगरकरमळा परिसरात असणार्‍या पाण्याच्या टाकीतून आगरकर मळा, रेल्वे स्टेशन परिसर, रवी रो हाऊसिंग सोसायटी, इंदिरा नगर, कायनेटीक चौक, कायनेटीक कंपनी परिसर, संजय नगर या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. यासाठी आगरकर मळ्यात 10 लाख लिटर पाण्याची क्षमता असणारी पाण्याची टाकी आहे. या टाकीचा वॉल दुरुस्तीसाठी मनपाने तयारी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी 10 लाख लीटर क्षमता असलेल्या टाकीतून संपूर्ण पाणी रस्त्यावर सोडावे लागले.

यामुळे या पाण्याच्या टाकीच्या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. ऐन उन्हाळ्यात शहरात पाणीबाणी सुरू असताना अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नगरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी मनपा पाणीपुरवठा विभाग प्रमुख महादेव काकडे यांनी घटनास्थळी जाऊन दुरूस्तीसाठी हालचाली केल्या. समता परिषदेचे दत्ता जाधव यांनी भेट देत अभियंता काकडे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, लाखो लीटर पाणी वाया जात असल्याने अनेकांनी अतिरिक्त पाणी भरुन घेतले. तर काहींनी चक्क गाड्या धुवून घेतल्या.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!