पुणेगाव डाव्या कालव्याला सोडले पूरपाणी; आ. डॉ. राहूल आहेरांच्या प्रयत्नांना यश

0
चांदवड | गतवर्षीप्रमाणे सध्याही वरूण राजाच्या कृपेने पुणेगाव धरण ओसांडून वाहू  लागले असतांनाच चांदवड, येवल्याला वरदान ठरणार्‍या पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याच्या मुळ संकल्पनेला मुर्त स्वरूप देण्यासाठी आमदार डॉ. राहूल आहेर यांनी पाठपूरावा केल्याने आज दुपारी १ वाजता पुणेगाव डाव्या कालव्यास पाणी सोडण्यात आले.
असून धरणाचा ओव्हर प्लो सुरू असेपर्यंत कालव्याला पाणी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
डोंगररांगाच्या कुशीत दिंडोरी-चांदवड तालुके शेजारी असले तरी दिंडोरी म्हणजे पावसाचे माहेरघर तर चांदवड नेहमी अवर्षणप्रवण असे विरोधाभासी चित्र कायमचे आहे.
याच धरर्तीवर ८० च्या दशकात प्रारंभी चांदवड तालुक्यातील शेती फुलविण्यासाठी पुणेगाव धरणाची निर्मीती करून पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालवा तयार करण्यात आला. सदर कालवा पुरपाण्याने प्रवाहीत करण्याचे प्रस्तावित असतांना जवळपास ४० वर्ष उलटून चांदवडकरांची प्रतिक्षा संपली नाही.
यावर्षी धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने व पाऊस अद्याप सुरू असल्याने पुणेगाव धरण ओसंडून वाहू लागले आहे. याच धर्तीवर चांदवडला वरदान ठरणार्‍या पुरपाण्याच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या कालव्याला मुर्त स्वरूप देण्यासाठी आमदार डॉ. राहूल आहेर यांनी कालव्याला पाणी सोडण्यासाठी गेली दोन तीन दिवस पाठपूरावा करताच.

आमदार डॉ. राहुल आहेर
आज दुपारी १ वाजता पुणेगाव डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले असून १०० क्युसेकने कालवा प्रवाही राहील असे पाणी टप्या-टप्याने सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा लाभ हा बोराळे, दुधखेड, पारेगाव चिखलआंबे, भाटगाव, परसूल या गावांना होणार असून पुणेगाव धरणाचा विसर्ग चालू असेपर्यंत कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याला हवे पूरपाणी : दरम्यान याच पार्श्‍वभूमीवर दरसवाडी धरणही ओसंडून वाहत असल्याने दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याकडेही पूर्व भागातील दिघवद, दहिवद, काजीसांगवी, रेडगाव, वाहेगाव, तळेगावरोही, साळसाणे आदी गावातील शेतकरी नजर लाऊन आहेत. कारण या भागातील नद्या-नाले अद्याप कोरडे ठाक असून दुष्काळाची टांगती तलवार कायम आहे. सदर कालव्याला पाणी सोडल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. त्यामूळे दरसवाडी-डोंगरगाव कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*