Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जलकुंभ दुर्घटना : सुजॉय गुप्ता यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी निर्णय

Share

नाशिक । प्रतिनिधी

सातपूरजवळील ध्रुवनगरमध्ये सुरू असलेला सम्राट ग्रुपच्या ‘अपना घर’ गृहप्रकल्पाच्या ठिकाणी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी फुटून परप्रांतीय मजुर महिलेसह चौघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चौघांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुख्य संशयित व सम्राट गृपचे चेअरमन सुजॉय गुप्ता आणि चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी चौघांना अटक केली असून पसार झालेल्या बांधकाम व्यावसायिक गुप्ता यांनी आज जिल्हा न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. या अर्जावर येत्या सोमवारी (दि. 8) युक्तीवाद होऊन सुनावणी होणार आहे. तसेच पोलिसांनाही म्हणणे मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

सम्राट ग्रुपच्या या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी गेल्या मंगळवारी (दि.2) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास फुटली होती. यात टाकीजवळ आंघोळ करणारे तीन मजुर व कपडे धुणार्‍या महिलेच्या अंगावर टाकीचा ढिगारा पडून मृत्यु झाला तर एक मजुर जखमी झाला होता.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन ठेकेदार भाविन पटेल, आशिष सिंग, सचिन शेवडे व नारायण कडलग यांना अटक केली तर मुख्य संशयित सुजॉय गुप्ता पसार झाला होता.

दरम्यान, (दि. 4) जिल्हा न्यायालयात संशयित गुप्ता याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यासंदर्भात न्यायालयाने गंगापूर पोलिसांकडून त्यांचे म्हणणे येत्या सोमवारपर्यंत मागविले आहे. त्यावर येत्या सोमवारी न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तीवाद झाल्यानंतर त्यावर सुनावणी होईल अशी माहिती संशयित सुजॉय गुप्ता यांचे वकील जयदीप वैशंपायन यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!