Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिककरांनो ऐका! पाणी वाया घालू नका; ‘या’ भागात पुढील दोन दिवस पाणी नाही

Share
नगरकरांच्या हितासाठी पाणीपट्टी दरवाढ स्वीकारणे आवश्यक, Latest News Water Bill Increse Amc Ahmednagar

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमधील संपूर्ण पंचवटी विभाग आणि पश्चिममधील प्रभागातील पाणी पुरवठा करणारी प्रमुख्य पाईपलाईन नादुरूस्त असल्याने पुढील दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तरी पंचवटीकरांनो पाणी जपून वापरा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

येथील बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र जवळील सिध्दार्थ नगर झोपडपट्टी येथून पंचवटी विभागास पाणी पुरवठा करणारी रॉ वॉटर पाण्याची मुख्य पाईप लाईन नादुरूस्त झाली आहे.

यामुळे युद्धपातळीवर पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासोबतच नाशिक रोड भागात तसेच नविन नाशिक विभागात अबंड येथे रस्ता क्रॉसींग करण्याचे काम प्रस्तावित असून त्याअनुषंगाने बुधवारी (दि. 27) रोजी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच गुरूवार (दि. 28) रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही

संपूर्ण पंचवटी विभाग, नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक 07 मधील थत्ते नगर, सौभाग्य नगर, लोकमान्य नगर, पंडीत कॉलनी, पाटील लेन, कॉलेज रोड,श्रीरंग नगर, जोशीवाडा, मल्हारखान झोपडपट्टी, अशोक स्तंभ, गंगावाडी, गोळे कॉलनी, रॉकेल गल्ली, मेहेर सिग्नल परिसर, घारपुरे घाट, रविवार पेठ, तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील शरणपुर रोड, विसे मळा, होलाराम कॉलनी, टिळकवाडी, गडकरी चौक,सहवास नगर, कालिका माता झोपडपट्टी, कुटे मार्ग, मातोश्री नगर, सी.बी.एस. परिसर, तसेच प्र.क्र. 13 मधील वकीलवाडी, घनकर लेन, फावडे गल्ली,सराफ बाजार, रविवार पेठ, परिसर गोरेराम लेन, मुरलीधर कोट, नेहरू चौक, भद्रकाली परिसर, दुध बाजार, पंचशील नगर, गंजमाळ एन.डी.पटेल रोड इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.

नाशिक पुर्व मधील जुने नाशिक आगर टाकळी, व्दारका परिसर व नाशिक रोड विभागातील जयभवानी रोड, सदगुरु नगर, चव्हाण मळा, अश्विन सोसा, आशर ईस्टेट, विहित गांव, आर्टलरी सेंटर, लॅम रोड इत्यादी परिसर बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र, पंचवटी निलगिरी बाग, गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा होणार नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!