Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : धरणांमधील पाणीपातळीत वाढ; गंगापूर ३४, दारणा ३८ तर नांदूरमध्यमेश्वर ५४ टक्के पाणीसाठा

Share

नाशिक | प्रतिनिधी

शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्वाच्या धरणांची पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे नाशिककरांसह नगर आणि मराठवाड्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार गेल्या ४८ तासांपासून सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणाचा १० टक्क्यांवर आलेला पाणीसाठा थेट ३४ टक्क्यांच्या वर गेला आहे. तसेच कश्यपी व गौतमी गोदावरीतील साठ्यातदेखील वाढ झाली असून अनुक्रमे २४ टक्के आणि २१ टक्के पाणीसाठयाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्यामुळे शहरात पाणीकपात करण्यात आली होती. सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे पाणी कपात आज रद्द होण्याची शक्यता आहे.

मुंबई-कोकणातून येणारा पाऊस महिनाभर लांबल्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर, दारणा व मुकणे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली होती. यामुळे महापालिकेने गेल्या रविवारपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करीत आणि नंतर गेल्या गुरुवारपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवत पाणीपुरवठ्यात कपात सुरू केली होती.

३१ जुलैपर्यंत शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. या पाणीकपातीच्या पहिल्या सहा दिवसांत सुमारे ७०० एमएलडी पाण्याची बचत झाली होती. याच पार्श्‍वभूमीवर शनिवारपासून शहर व परिसरात सुरू झालेल्या पावसाने नाशिककरांना मोठा दिलासा दिला.

गेल्या शुक्रवारी गंगापूर धरणातील पाणीसाठा १० टक्क्यांपर्यंत आला होता. त्यानंतर शनिवारी आणि रविवार पूर्ण दिवस तसेच आजही याठिकाणी पाऊस सुरु असल्यामुळे सकाळी देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ३४ टक्क्यांवर गंगापूरचा पाणीसाठा पोहोचला आहे.

तर कश्यपीमधील पाणीसाठा २४ टक्के तर गौतमी गोदावरी धरणातील साठा २१ टक्के इतका झाला आहे. त्याचबरोबर दारणा धरणातील साठा १३ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मुकणेतील साठा २.३५ वरून १२ टक्के इतका झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!