Type to search

Breaking News Featured नाशिक

येवला बस स्थानकात पाणी साचल्याने आगारास तळ्याचे स्वरूप

Share

येवला | राजेंद्र शेलार

येवला शहरासह तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली असली तरी तालुक्याचा काही भाग चातकाप्रमाणे पावसाची वाट पहात आहे आज येवला शहरात चांगला पाऊस झाला या पावसाने एसटी महामंडळाच्या येवला आगारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आगाराला जणू काही तळ्याचे स्वरूप आले होते येवला आगारातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

त्या खड्यात पाणी साचल्याने एसटी कशी चालवावी असा प्रश्न चालकाला पडला असावा कारण चुकून गाडी खड्यात गेली अन प्रवाशाच्या अंगावर पाणी उडाल्यास त्याचा दोष चालकावरच येत असल्याने चालक व प्रवाशात वाद होत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने येथील खड्याची लवकर डागडुजी करावी अशी मागणी त्रस्त प्रवाशांनी केली आहे.

छायाचित्र: संतोष बटाव

काल प्रमाणेच आजही येवला शहर,सायगाव पाटोदा विखरणी गुजरखेडे कातरणी या परिसरात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काल आणी आज झालेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली असली तरी जोपर्यंत बंधारे,नाले दुथडी भरून वाहत नाही तो पर्यंत विहिरींना पाणी उतरणार नाही अन विहिरीत पाणी नसल्याने शेतकऱ्यांना पुढील पिकाचे नियोजन करता येत नसल्याने शेतकरी मोठ्या पावसाची वाट पहात आहेत.

एकीकडे ही परिस्थिती असताना ग्रामीण भागातील अगोदरच खराब असलेल्या रस्त्यांना दोन दिवस झालेल्या पावसाने अजूनच मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे आता रस्त्याने गाडी चालवणे मोठे दिव्य झाले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!