Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकणार्‍यांविरोधात लढा उभारणार

Share

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – भंडारदरा ते ओझर प्रवरा नदीवर अनधिकृत बंधारे व शेकडो विहिरी बांधून लाभक्षेत्राच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे याविरोधात लढा उभारण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील गावागावातील शेतकर्‍यांनी एकत्रित येण्याचे आवाहन भंडारदरा लाभक्षेत्र पाणी संघर्ष समितीने केले आहे. भंडारदरा लाभक्षेत्राचे हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी भंडारदरा लाभक्षेत्र पाणी संघर्ष समितीने काल प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सुमारे तीन तास आंदोलन सुरु होते. मात्र आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी अधिकारी न आल्याने अखेर आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकार्‍यांच्या दालनासमोर ठिय्या दिला.

यावेळी हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, अनधिकृत बांधलेले बंधारे उद्ध्वस्त करा अशा घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी शेतकर्‍यांसह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून हक्काच्या पाण्याबाबत आवाज उठविण्याची गरज असल्याचे सांगितले. भंडारदरा ते ओझरपर्यंतची प्रवरा नदी कालवा असून जलसंपदा विभागाच्या परवानगीशिवाय कुणालाही अडविण्याचा अधिकार नाही. तरी देखील ओझर बंधार्‍याच्या उर्ध्व बाजूला नदीपात्रामध्ये अनधिकृत बांध घातलेले आहेत.

तसेच या नदीपात्रामध्ये खासगी मालकीच्या शेकडो विहिरी खोदलेल्या आहेत. त्या विहिरींची मालकी सातबारावर नसतानाही महावितरणने वीज जोडण्या दिलेल्या आहेत. त्यामुळे हक्काच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊन त्याचा फटका लाभक्षेत्राला बसत आहे.
अनधिकृत बंधारे बांधून लाभक्षेत्राच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आपल्या भागाचे वाळवंट होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे याविरोधात सर्व शेतकर्‍यांनी लढा उभारण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन आपल्या मनोगतातून शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, जितेंद्र भोसले, चंद्रकांत उंडे, मिलींद साळवे, श्री. खंडागळे, बाळासाहेब उंडे यांनी केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय लिप्टे, शिवाजीराव जवरे यांच्यासह बापुसाहेब आदिक, अ‍ॅड. दीपक बारहाते, लक्ष्मण धोत्रे, अशोकराव बडधे, गणेश धुमाळ, अनिल ताके, रणजित बनकर, प्रदीप अभंग, गोरख बारहाते, राजेंद्र भोसले, अ‍ॅड. प्रवीण लिप्टे, राजेंद्र भांड, राहुल भुजबळ, शंकरराव आढाव, जगन्नाथ भोसले, किरण शेटे, रावसाहेब आढाव, ईश्‍वर दरंदले, राजेंद्र थोरे, बबन खरात, राजेंद्र खरात, महेश लवांडे आदींसह शेतकरी उपस्थित होते. ठिय्या आंदोलना दरम्यान उपनगराध्यक्ष करण ससाणे व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन गुजर यांनीही उपस्थित लावली.

संगमनेर-श्रीरामपूर शेतकर्‍यांची संयुक्त बैठक बोलाविणार
प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या दिल्यानंतर नायब तहसीलदार तलोरे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारले. आपल्या मागण्या जिल्हाधिकार्‍यांपर्यंत पोहचवून अनधिकृत बंधारे व विहिरी संदर्भात संगमनेर व श्रीरामपुरातील शेतकर्‍यांची जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार संयुक्त बैठक घेऊन त्यात निर्णय घेऊ, असे आश्‍वासन नायब तहसीलदार तेलोरे यांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!