प्रति थेंब अधिक पीक योजना राबविणार

0

नगरसह राज्यात अल्पभूधारक शेतकर्‍यांना 55 तर इतरांना 45 टक्के अनुदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सुक्ष्म सिंचन) योजनेची सन 2017 मध्ये राज्यात अंमलबजावणीसाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार एकशे चौर्‍याहत्तर कोटी ऐंशी लाख रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नगरसह राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी. त्याची नोंद सातबार उतार्‍यावर असावी. इतर साधनांद्वारे (बंधारे/कॅनॉल) सिंचनाची व्यवस्था असल्यास संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र शेतकर्‍यांना अनिवार्य आहे. आधारकार्ड सक्तीचे असून अनुदानाची रक्कम थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात इएफटीद्वारे जमा होणार आहे. पात्र शेतकर्‍यांना 5 हेक्टरच्या क्षेत्राच्या मर्यादेत लाभ दिला जाणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी 55 टक्के तर इतर शेतकर्‍यांना 45 टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेतकर्‍यांचे अर्ज फक्त ई-ठिबक आज्ञावलीमध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारेच स्वीकारण्यात येणार आहे. त्यात अर्जदाराची नोंदणी बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

*