पाणीयोजना 11 कोटींवर जाऊनही शहर तहानलेलेच!

0
राहाता (तालुका प्रतिनिधी) – 17 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या राहाता पालिकेच्या पाणी योजनेचे काम एक तपानंतर पूर्ण झाले. मंगळवारी साठवण तलावात पाणी सोडून चाचणी घेण्यात आली. मात्र पाणी सोडल्यानंतर या पाईपलाईनला अनेक ठिकाणी बुळक्या लागल्या. दोन तासांतच ठिकठिकाणी पाईपलाईन फुटली. त्यामुळे योजनेचे काम सुमार दर्जाचे झाले याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. साडेतीन कोटीची योजना 11 कोटीवर जाऊनही शहर तहानलेलेच असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. योजनेचे तातडीने काम पूर्ण करा व तलावात पाणी सोडा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राहाता शहरासाठी नवीन सुधारीत योजना 17 वर्षानंतर पूर्णत्वास आली. मात्र योजनेचे काम सुमार दर्जाचे झाल्याने पाटावरून साठवण तलावात पाणी सोडण्याची चाचणी जीवन प्राधीकरण विभागाचा ठेकेदार व राहात्याच्या नगराध्यक्ष सौ. ममता पिपाडा तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत दोन दिवसापूर्वी करण्यात आली. योजनेतून पाणी सोडण्यात आले, मात्र दोन तासातच या योजनेला गळती लागून पाईप फुटल्याने चाचणी फेल झाली.

तलावात पाणी गेलेच नाही. लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. यामुळे या योजनेच्या दर्जाबाबत नागरीकांत चर्चेला उधाणआले आहे. राहाता शहराला पुढील 25 वर्षाच्या लोकसंखेचा विचार करून वाढीव पाणी पुरवठा योजना सन 2001 साली महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने मंजूर केली. यासाठी राहाता पालिकेने या योजनेसाठी 16 एकर जमीन खरेदी करून जीवन प्राधीकरणाला दिली. सुरवातीपासूनच योजनेचे काम कासवाच्या गतीने सुरू होते. पहिली मंजूरी साडेतीन कोटीची होती, काम रखडल्याने ती पाच कोटीवर गेली व सतरा वर्षात योजना 11 कोटीवर गेली. तरीही अद्याप योजना पूर्ण नाही.

तलावात पाणी सोडण्याच्या पहिल्याच चाचणीत गळती लागली. सुमारे चार कि.मी. पाणी गोदावरी कालव्यातून साठवण तलावात सोडायचे. तलावातून विद्युत पंपाद्वारे पाणी शहरातील मुख्य जलकुंभात टाकायचे. यासाठी लागणारा विद्युत पुरवठा येथे नाही. स्वतंत्र विद्युतरोहित्र नाही, पोल नाही, आणखी किती वर्षे या योजनेच्या पाण्याची नागरिकांना वाट पाहावी लागणार?

भविष्यातील पंचवीस वर्षे नियेजनातील सतरा वर्ष वाया गेली. नियोजनातील 7 वर्ष शिल्लक आहेत. प्रत्यक्षात नळाला पाणी येण्यास अजून किती काळ लागणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. तलावात गोदावरी कालव्याचे ओहरफ्लोचे पाणी सोडा, पालिकेचे नाही पाणी मिळाले तरी विहिरींना याचा फायदा होईल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल अशी आशा परिसरातील नागरिकांनी प्रदर्शित केली आहे.

योजना 17 वर्षे रखडली –
साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या या योजनेला सन 2001 मधे मंजुरी मिळाली, 17 वर्षांत या योजनेची किंमत सुमारे 11 कोटी झाली. नुकतीच तलावात पाणी सोडण्याची चाचणी झाली. अजून पंपहाऊस, लाईट ,पोल सर्वच बाकी. योजना पूर्ण करून सर्व टेस्ट घेऊन मग ती नगरपालिकेकडे हस्तांतरित होईल. याला अजून किती कालावधी लागणार याबाबत पालिका प्रशासन व ठेकदार मौन बाळगून आहेत.

LEAVE A REPLY

*