श्रीगोंदा तालुक्यातील 9500 हेक्टर फळबाग लागवडीला पाण्याची झळ

0
लिंपणगाव (वार्ताहर)- श्रीगोंदा तालुक्यात 9500 हेक्टरवर चालु वर्षी फळबाग लागवड करण्यात आली. कुकडीचे दोन उन्हाळी आवर्तन देण्याचे ठरलेले असतानाही धरणात मुबलक पाणीसाठा नसल्याचे सांगून अवघे एका आवर्तनावर फळबागांची तहान भागविण्याची वेळ फळबाग लागवडधारकांवर आली.
त्यातूनच खरी पाण्याची झळ फळबागांना सोसावी लागली. शेतकर्‍यांनी फळबागा जगविण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याचे पर्याय वापरले पण ते न परवडणारेच ठरले. टँकरने पाणी घालून फळबागा जगविण्याची कसरत करूनही आता पाणीसाठेच घटल्याने वरुण राजाच्या भरोशावरच फळबागांचे भविष्य ठरणार आहे.
श्रीगोंदा तालुका कुकडीचे 70 टक्के तर घोडचे 30 टक्के सिंचन क्षेत्राखाली आहे. आवर्तनाची कपात शेतकर्‍यांना महागाची ठरली आहे. तालुक्यात 3000 हेक्टर डाळींब, 5000 हेक्टर लिंबू, 450 हेक्टर द्राक्ष, 300 हेक्टर आंबे अशी लागवड करण्यात आली आहे.
पाटबंधारे खात्याकडून उन्हाळी दुसरे आवर्तन मिळेल ही आशा फोल ठरली. आज तालुक्यात फळबाग लागवडीला पाण्याची झळ बसायला सुरवात झाली आहे. उपलब्ध पाण्याचे पर्यायही शेवटच्या घटका मोजत असल्याने केवळ रोहीणी नक्षत्रातील चांगला पाऊस व्हावा अशीच अपेक्षा आता शेतकरी करत आहे.

1200 झाड डाळिंबाची आहे. पाण्याची झळ बसायला सुरवात झाली आहे. उन्हाळी आवर्तन न मिळाल्याने आता केवळ वरुण राजाची कृपा झाली तर आमची फळबाग जगेल.
शरद कुरुमकर


शेतात 250 लिंबाची झाडे असून ठिबक पध्दतीने पाणी देत आहोत परंतु आता पाणी पातळीच घटल्याने फळबागांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. केवळ पावसाची साथ मिळणे आवश्यक आहे.
मधुकर होले

LEAVE A REPLY

*