गंगापूर धरणात 5 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

0

नाशिक । गतवर्षी समाधानकारक झालेल्या पावसामुळे यंदा गंगापूर धरण समूहात नाशिक शहराला 105 दिवस म्हणजे 5 ऑक्टोबरपर्यंत पूरेल इतके पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस लांबला तरीही नाशिक शहराला तशी पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे उपलब्ध साठ्यावरुन दिसून येत आहे.

गंगापूर धरणातून प्रामुख्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामूळे या धरणावर नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आहे. महापालिका धरणातून दररोज 14 दलघफु इतक्या पाण्याची उचल करते. शहराला दररोज पिण्यासाठी 420 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे.

आजच्या स्थितीत गंगापूर समुहात असलेले 1478 दलघनफुट पाणी मनपाला पुढील 105 दिवस पुरेल. जूनच्या सुरूवातीलाच मान्सुनपूर्व पावसाने चांगली सलामी दिल्याने आणि हवामान खात्याने यंदा मान्सून सक्रीय राहाणार असल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे.

विषेश म्हणजे तो सरासरीही गाठणार असल्याने पाण्याची चालू वर्षी चिंता करण्याची गरजच नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. सध्या धरणात 13 टक्के पाणीसाठा आहे. अधून-मधून पडणा-या पावसानेही धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत नसली तरीही तो स्थिर राहाण्यास मदत होत आहे.

शिवाय दारणातूनही पाणी 500 दलघनफूट इतके पाणी राखीव आहे. त्यापैकीही 300 दलघनफूट पाणी अद्यापही महापालिकेसाठी उपलब्ध आहे. गेल्यावर्षीच्या चांगल्या पावसामुळे यंदा धरणातही गतवर्षीच्या तुलनेत 441 दलघनफूट म्हणजे 4 टक्के अधिक पाणी शिल्लक आहे.

गतवर्षी 1037 दलघनफूट इतके पाणी होते यंदा तब्बल 1478 दलघनफूट इतके पाणी समुहात शिल्लक आहे. तर गंगापूर धरणातही गतवेळच्या 18 टक्क्यांपेक्षा दोन टक्के अधिक म्हणजे 20 टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यामूळे यंदा नाशिककरांवरील पाणी टंचाईचे संकट टळेल असे दिसते.

LEAVE A REPLY

*