Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पाण्यावरून दोघांवर हल्ला; तेरा आरोपींना सक्तमजुरी

Share

श्रीगोंद्यातील हिरडगावची घटना

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- तालुक्यातील हिरडगाव येथे विहिरीच्या वादातून दोघांवर हल्ला करत त्यांना जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी तीन वर्षांची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. भांबर्डे यांनी हा निकाल दिला. शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये अंबादास राऊ दरेकर, नारायण राऊ दरेकर, झुंबर राऊ दरेकर, दशरथ राऊ दरेकर, रमेश अंबादास दरेकर, अनिल झुंबर दरेकर, संजय दशरथ दरेकर, सुनील दशरथ दरेकर, साखराबाई अंबादास दरेकर, नंदाबाई नारायण दरेकर, जनाबाई दशरथ दरेकर, कुसुमबाई झुंबर दरेकर, गुंफाबाई अनिल दरेकर सर्व रा. हिरडगाव, ता. श्रीगोंदा यांचा समावेश आहे.

हिरडगाव येथे वरील आरोपींनी विहिरीच्या पाण्याच्या वादातून बापूराव रंगनाथ दरेकर व बाळासाहेब दरेकर यांना मारहाण केली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजीराव सोनवणे यांनी केला होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. दरम्यान या घटनेप्रकरणी आरोपींना श्रीगोंदा येथील न्यायदंडाधिकारी यांनी शिक्षा ठोठावली होती. आरोपींनी या निकालाविरोधात दाद मागितली होती. जिल्हा न्यायालयात आलेले साक्षी पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना शिक्षा आरोपींना शिक्षा देण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड.केदार गोविंद केसकर यांनी काम पाहिले तर त्यांना अ‍ॅड. मोहन कुलकर्णी यांनी मदत केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!