Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

रब्बीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत पाणी अर्ज मुदत

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – सन 2018-19 या वर्षामधील भंडारदरा धारणातील दिनांक 16 ऑक्टोबर 2018 रोजीचा उपलब्ध उपयुक्त पाणी साठा विचारात घेऊन प्रवरा नदी (भंडारदरा ते ओझर) प्रवरा डावा व उजवा तट कालव्यावरील पिण्यासाठी 31 जुलै 2017 पर्यंत पुरेल इतके पाणी आरक्षित करून जे पाणी शिल्लक राहील त्या पाण्यामध्ये रब्बी हंगाम सन 2018-19 (दिनांक 15 ऑक्टोबर 2018 ते 28 फेबु्रवारी 2019) मध्ये प्रवरा डावा व उजवा तट कालव्यावरील लाभक्षेत्रातील उभ्या ऊस, फळबाग,

अन्नधान्य चारा इतर रब्बी हंगामी पिकांना शर्ती व अटीस अधीन राहून प्रत्येक खातेदारास रब्बी हंगामातील दोन पाणी देण्याचे नियोजित असून त्याप्रमाणेे शासन व वरिष्ठ कार्यालयाचा जो निर्णय होईल त्याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. इच्छुक शेतकरी बांधवांनी वरील पिकाचे पाणी अर्ज (प्रवाहासाठी नं.7 , उपसासाठी नं. 7 अ सुधारीत) संबंधित शाखा कार्यालयांत दिनांक 31 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत दाखल करावेत. उशीरा आलेल्या पाणी अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच अधिक माहितीसाठी अहमदनगर पाटबंधारे विभागाशी संपर्क साधावा असे एका पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!