Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : वालदेवी नदीच्या पाण्याची पातळी वाढली; नदीकाठी सावधानतेचा इशारा

Share

नाशिकरोड | वार्ताहर 

देवळाली गाव परिसरातून वाहणाऱ्या वालदेवी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे सायंकाळी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. वालदेवी नदी शहरातील विहितगाव, देवळाली गाव व रोकडोबा वाडी परिसरातून वाहते. ही नदी पुढे दारणा नदीला जाऊन मिळते.

आज दुपारपासून संततधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पटली कमालीची वाढली होती. देवळाली कॅम्प, भगूर, नाशिकरोड परिसरात पावसाने हाहाकार माजवला आहे.

अजूनही या परिसरात पावसाच्या पाण्याची पातळी जैसे थे आहे. द्वारका ते नाशिकरोड परिसरातील रस्ते अजूनही पाण्याखाली गेलेले आहेत. चाकरमान्यांना पडत असलेल्या पाण्यात घर गाठावे लागले.

वालदेवी नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

नाशिकरोड परिसरात वीर सावरकर उड्डाण पुलाच्या खाली तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. मुंबईत झालेल्या पावसासारखाच थरारक अनुभव आज नाशिकच्या काही परिसरात दिसून आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!