Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मनमाडमध्ये लातूरपेक्षाही भयाण परिस्थिती; ‘वागदर्डी’तील मृत साठाही संपला

Share

मनमाड (प्रतिनिधी) | मनमाडला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाण्याचा मृत साठा देखील संपला असून आता धरणात फक्त गाळ मिश्रित गढूळ पाणी उरल्यामुळे शहरात लातूर पेक्षाही जास्त अशी अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

धरणातील पाणी साठा संपुष्टात आल्यांमुळे त्यामुळे पालिका प्रशासनाने आज (शनिवार) पासून शहरातील पाणी पुरवठा बंद केला आहे.पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याचे ऐकून पाणी कुठून आणायचे असा प्रश्न सव्वालाख नागरिकांना पडला असून पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्यात यावे अशी मागणी नगराध्यक्षा पद्मावती धात्रक यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली.

दरम्यान शहरात उद्भवलेल्या या गंभीर समस्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी रविवारी सकाळी १० वाजता पालिकेच्या सभागृहात सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती गटनेते गणेश धात्रक यांनी दिली या बैठकीत सर्व नगरसेवक,नगरसेविका,शहरातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन धात्रक यांनी केले.

गेल्या तीन वर्षा पासून मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी  धरण परिसरात पाऊस झाला नाही त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा हा पालखेड धरणातून आवर्तना द्वारे मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे.धरणातून फेब्रुवारी महिन्यात मिळालेले पाणी आता पर्यंत पुरले मात्र वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी झाला.

आता तर गाळ मिश्रित गढूळ पाणी उरले आहे. त्यामुळे त्यातून पाणी पुरवठा करणे शक्य नसल्यानेपालिका प्रशासनाने  आज पासून शहरात पाणी बंद केला आहे.

शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईची कल्पना आपण पालक मंत्री गिरीश महाजन,जिल्हाधिकारी मांढरे साहेब व इतर अधिकाऱ्यांना देवून पालखेड धरणातून तातडीने पाण्याचे अव्रत्न सोडण्याची मागणी केल्याची माहिती गणेश धात्रक यांनी दिली.

दरम्यान पालिका प्रशासनाने पाणी पुरवठा बंद केल्यामुळे शहरातील सव्वा लाख नागरिकांच्या तोंडचे पाणी पाळले असून पाणी आणावे कुठून असा प्रश्न त्यांना पडला आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!