Thursday, April 25, 2024
Homeनगरसांडवे येथेे ‘पाणीदान’

सांडवे येथेे ‘पाणीदान’

सार्वमत

‘माझे गाव, माझे कर्तव्य’ समितीचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील सांडवे येथे गावातील पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून माझे गाव, माझे कर्तव्य समितीच्यावतीने स्वखर्चातून ‘पाणीदान’ उपक्रमाअंतर्गत गावकर्‍यांना मोफत पिण्याचे पाणी वाटप करण्यात येत आहे.

- Advertisement -

समितीचे खजिनदार प्रविण यादव खांदवे हे स्वतः मालकीच्या कूपनलिकेचे (बोरवेल) पाणी जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मोफत देणार आहेत. तर समितीतील दोन सदस्य दररोज टँकर चा वाहतूक खर्च देणार आहेत. 6 एप्रिलपासून पाणी वाटपास सुरूवात झाली आहे.

आतापर्यंत समितीचे अध्यक्ष आसिफ शेख यांनी एक, सचिव संजय माने यांनी एक, सदस्य रमेश खांदवे यांनी दोन, सदस्य त्रंबक आरु यांनी दोन टँकर पाणी गावकर्‍यांसाठी दिले आहे. तर 9 एप्रिलपर्यंत प्रफुल्लसिंग परदेशी हे एक, भाऊ घोलप हे एक, सखाराम बेद्रे हे एक, प्रविण खांदवे हे दोन टँकर पाणी देणार आहेत. या ‘पाणीदान’ उपक्रमामध्ये सहभागी होण्यास इच्छूक असलेल्यांनी संपर्क साधावा असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या