मालेगावमध्ये पुन्हा पुर; नदीकाठी सावधानतेचा इशारा
Share

नाशिक | प्रतिनिधी
हरणबारी, चणकापूर, केळझर आणि पुनद धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे गिरणा आणि मोसम नदीला पुन्हा एकदा पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आला आहे.
कळवण तालुक्यातील चणकापूर, हरणबारी, केळझर आणि पुनद धरणातून गिरणा नदीपात्रात आज विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज सकाळी ११ वाजता चणकापूर धरणातून ६४८१ क्युसेक, हरणबारीमधून ४२८१ क्युसेक, पुनदमधून ४३७८ क्युसेक, तर केळझर धरणातून २०१२ क्युसेकने विसर्ग होत आहे.
सततच्या पावसामुळे विसर्गात वाढ झाल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून नदीकाठी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील गावे, वाड्या, वस्त्या, यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तलाठी ग्रामसेवक, पोलीस यंत्रणा यांना सतर्क करण्यात आले आहे. मालेगाव शहरातील रोकडोबा देवस्थान, गिरणा पूल, टेहरे पूल, मालेगाव कॅम्प परिसर व शहरातील नदीकाठावर सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.