Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गंगापूर धरण ५० तर नांदूरमध्यमेश्वर ९१ टक्के भरले; १६१४ क्युसेकचा विसर्ग

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे गोदावरी खोऱ्यात असलेल्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आजच्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गंगापूर धारण ५० टक्के भरले आहे. तर गोदाखोऱ्यात असलेल्या कश्यपी,  गौतमी, आळंदी धरणांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे.

काल त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. नद्या नाले तुडुंब भरून वाहत होते. यामुळे गोदावरी नदी उगमापासूनच खळाळून वाहत होती.

जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात असलेल्या कश्यपी ३१, गौतमी ३४ आणि आळंदी धरण २२ टक्के भरले आहे. तर इगतपुरी तालुक्यातील दारणा ६२,  भावली ६९,  मुकणे २१, वालदेवी ५३, कडवा ४२ टक्क्यांपर्यंत भरले आहेत.

नांदूर मध्यमेश्वर ९१ टक्क्यांपर्यंत भरले असून कालपासून १६१४ क्युसेस पाण्याचा विसर्ग या बंधाऱ्यातून केला जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!