Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक शहरात उद्या पाणीपुरवठा बंद; रविवारी कमी दाबाने येणार पाणी

Share

नाशिक | प्रतिनिधी

गंगापूर व मुकणे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी संपूर्ण नाशिक शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

नुकतेच महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेच्या गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रास होणारा पाणीपुरवठा लाईन सिद्धार्थनगर कॅनॉललागत गळती असल्याने गळतीची दुरुस्ती, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथील ९०० मिलीमीटर जलवाहिनी बदलणे, कोनार्कणार येथील येथे जोडणी करणे, म्हसरुळ येथील रायझिंग मेन ओअर व्हॉल्व बदलणे,

कालिका पंपींग स्टेशन येथील व्हॉल दुरुस्ती करणे, गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथील रॉ वॉटर व्हॉल्व दुरुस्ती करणे, नाशिकरोड पवारवाडी येथील रायझिंग मेन दुरुस्ती करणे, नवीन नाशिक मुख्य लाईनवर अंबड येथे क्रॉस कनेक्शन करणे, शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथे रायझिंग मेन लाईन दुरुस्ती करणे ही कामे अत्यावश्यक आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी संपूर्ण शहराकरीता होणारा गंगापूर धरण व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे.

तसेच रविवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!