देवनदीवरील बंधारा फुटला

0
सिन्नर | देवनदीवरील दातली येथील साठवण बंधारा फुटला. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा बंधारा भरल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र अचानक हा बंधारा फुटल्यामुळे येथील पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

देवनदी दुथडी भरुन वाहु लागल्याबरोबर शेतकर्‍यांना झालेला आनंद फार काळ राहीला नाही. कमलाकर शिंदे यांच्या शेतालगत असलेला साठवण बंधारा फुटल्याने सर्व साठलेले पाणी वाहुन गेले.

बंधार्‍याच्या पाण्यावर आवलंबुन असणार्‍या शेतकर्‍याचे नूकसान झाले आहे. या देव नदीवरील साठवण बंधार्‍याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच उज्वला नागरे, उपसरपंच ज्ञानेश्वर नागरे सदस्य धनराज कुटे माजी सरपंच लहानु भाबड, कमलाकर शिंदे आदींसह दातली केदारपुर परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*