Friday, April 26, 2024
Homeनगरटंग टंग टंग… चला पाणी प्यायला..!

टंग टंग टंग… चला पाणी प्यायला..!

श्री समर्थ शाळेत वॉटर बेल उपक्रम । शहरातील पहिलीच शाळा

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील ठराविक शाळांनी सुरू केलेला ‘वॉटरबेल’ उपक्रम आता नगर शहरातही सुरू झाला आहे. शहराच्या सांगळे गल्लीतील श्री समर्थ विद्या मंदिर (प्राथमिक) शाळेत आता पाणी पाण्यासाठी अशा प्रकारची घंटा खणखणत आहेत. दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यासाठी वॉटर बेल वाजणार आहे. टंग टंग टंग…वॉटर बेल होताच मुलं पाणी पिण्यासाठी बाहेर पडत असल्याचे प्रत्यक्ष भेटीत दिसून आले.

- Advertisement -

नगर शहरात प्रथमच वॉटर बेलचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचे संस्थापक व पालकवर्गाकडून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक व शारीरिक क्षमतावाढीसाठी विविध उपक्रम या शाळेत राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने केरळ राज्यातील विविध शाळांत ‘वॉटर बेल’ होते. त्याच धर्तीवर समर्थ शाळेमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

विद्यार्थी शाळेमध्ये सहा तास असतो. पण कित्येकदा मुलांचे पाणी पिण्याकडे त्याचे प्रचंड दुर्लक्ष होते. शरीराच्या वाढीसाठी जसे अन्न गरजेचे आहे, तितकेच पाणीही गरजेचे आहे. त्यामुळेच ङ्गवॉटर बेलफ उपक्रम सुरू केल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विद्यार्थी, शिक्षक या उपक्रमात आनंदाने सहभागी होत असल्याचे दिसून आले. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक अजय महाजन, शाळा समिती चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले आहे. संस्थेचे सेक्रेटरी प्र. स. ओहळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सतीश मेढे, तिलोत्तमा क्षीरसागर, वैशाली मगर, लीना बंगाळ आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या