चष्म्याशिवाय पहा 3D सिनेमे!

0

थिएटरमध्ये कधीही थ्रीडी सिनेमा पाहायला गेले की, डोळ्यावर लावाव्या लागणार्‍या चष्म्याचा नााही म्हटलं तरी अनेकांना कंटाळा येतो. यावर उपाय म्हणू थ्रीडी डायरेक्ट दिसू शकेल अशा तंत्रज्ञानाचा शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. ही थ्रीडी पाहणार्‍या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी एका अशा स्क्रीन तंत्रज्ञानाचे संशोधन केले आहे. ज्यामुळे थिएटरमध्ये थ्रीडी चित्रपट पाहताना तुम्हाला चष्मा लावण्याची गरज भासणार नाही. या नव्या तंत्रज्ञानाला सिनेमा थ्रीडी असे नाव देण्यात आले आहे. एमआटीच्या वैज्ञानिकांनी ही स्क्रीन विकसित केली असून ही स्क्रिन विशेष लेन्स आणि मिररच्या मदतीने तयार करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना एमआयटीचे प्रोफेसर वोजशिक मुसिक यांनी सांगितले की, सध्या थ्रीडी चित्रपट पाहण्यासाठी बनवण्यात आलेले चष्मे हे व्यवहार्य नाही. कारण हे चित्रपट पाहण्यासाठी अधिक रिझोल्यूशनच्या स्क्रीनची आवश्यकता असते. पण या तंत्रज्ञानात त्याची गरज भासणार नाही आणि त्यामुळे तुम्ही थ्रीडी चित्रपटाची मजा विना चष्मा अनुभवू शकता.

दरम्यान, वैज्ञानिकांनी सांगितले आहे की ही सुविधा सर्व सुलभ नाही, पण लवकरच या सुविधेचा लाभ सामान्य लोक देखील घेऊ शकतील.

LEAVE A REPLY

*