Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याप्रशासनाच्या मेहनतीवर पाणी?

प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद निवडणुकीची ( Zilla Parishad Election Process )प्रक्रीया अंतिम टप्प्यात असतांनाच महाराष्ट्र राज्य शासनाने सन 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रशासनाने केलेल्या मेहनतीवर पाणी फिरले गेले आहे.इजा बिजा नव्हे तर तीनदा निवडणुकीच्या कामांमध्ये फेरबदल झालेला असतांना आता पुन्हा संपुर्ण प्रक्रियाच नव्याने राबविण्याची वेळ आली आहे.दरम्यान, राज्य निवडणूक आयोग काय निर्देश त्यांनंतरच पुढील कामाचे स्वरूप ठरणार आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासन आदेशाच्या प्रतीक्षेत आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे 84 गट आणि पंचायत समित्यांच्या 168 गणांच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिध्द झाला त्यानुसार 11 गट व 22 गण वाढले.11तालुक्यांमधील पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या गटांमध्ये मोठे फेरफार होऊन नव्याने गट तयार झाले.

नव्या प्रारूप आराखड्यानुसार गट व गणांच्या सीमारेषांमध्ये बदल होऊन गटांची संख्या 72 (ओझर गट रद्दनंतर) गटांवरून 84 झाली. त्यातुलनेत गणांची संख्या देखील 168 झाली. त्यानंतर आरक्षण सोडत जाहिर झाली. यासाठीची व्यापक प्रक्रीया राबविण्यात आली.

जिल्ह्यातील सेवकांनी यासाठी कष्ट घेतले.जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर राजकीय गणिते आखली जात असल्याने आता निवडणुका होतील अशीच सर्वांची अपेक्षा होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दृष्टीपथात येत असतांनाच आता राज्य शासनाच्या पुन्हा नवीन निर्णयामुळे या प्रक्रियेला ब्रेक लागणार आहे.

आता जुन्या रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने यापूर्वीच्या गट-गणांनुसारच जिल्हा परिषदेची निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. शासनाच्या निर्णयानुसार 75 पेक्षा जास्त जागा ठेवता येणार नसल्याने जुन्या 72 जागांनुसारच जिल्हा परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या