इंदिरानगर परिसरात वाॅशिंग मशीनचा स्फोट

0

इंदिरानगर | वार्ताहर

इंदिरानगर परिसरात वाशिंगमशीनचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. घटनेची गांभीर्यता लक्षात घेत तत्काळ देवदूत आणि अग्निशमन विभागाकडून आग आटोक्यात आणण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

येथील गुरुकृपा हाईटस या सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. अधिक माहिती अशी की, आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर राहणारे महेंद्र कुमार सिंग यांनी एक महिन्यापूर्वी नवीन वाशिंग मशीन खरेदी केले होते.

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास अचानक मशीनचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता मोठी होती. परिसरात मोठा आवाजही झाला.

त्यानंतर आगीचा भडका उडाला. परिसरात धुराचे लोळ पसरू लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला याबाबत कल्पना दिली.

काही वेळातच नाशिक अग्निशमन दल व इंदिरानगर पोलिस घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले.  इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट-मार्शल मनोज परदेशी यांच्यासह महाजन व अग्निशमन दलाचे जवान यांनी त्वरित आग आटोक्यात आणली.

LEAVE A REPLY

*