रेशन दुकानदारांचा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

0

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन  

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रलंबित मागण्या मान्य न झाल्या नाहीत या निषेधार्थ 1 ऑगस्ट पासून जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदारांनी संपावार जाण्याचा एल्गार पुकारला आहे. या संदर्भात गुरूवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.
गुरुवारी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेते जिल्हाधिकारी परिसरात एकत्र जमले होते.माल वजन करावा, नफ्यात वाढ करावी, आधार जोडनीची शंंभर टक्के काम पूर्ण झाल्यावरच पीओएस मशीनची सक्ती करावी, केशरी कार्ड धारकान्यांना एपीएल दराप्रमाणे माल उपलब्ध करून द्यावा, दुकानात मदतनीस ठेवण्यास परवागी द्यावी, वधवा कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या,
रॉकेल विक्रेत्यांना गॅस वितरणाचा परवाना देण्यात या धारकांना, तामिळनाडू व झारखंड या राज्याप्रमाणे अन्न महामंडळांची स्थापना करून दुकानदारांनाचा समावेश करावा, आदी मागण्या संदर्भात शासनाने तातडीने दखल न घेतल्यास दि.1 ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा इशारा रेशन दुकानदारांनी दिला आहे.
या निवेदनावर देवीदास देसाई, बाळासाहेब दिघे, अशोक साठे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत झुरंगे, बजंरग दरंदले, नवनाथ मंडलीक,देवराम वाघमोडे, बाबा चोथे, सोपनाथ पागिरे, रमेश पवार, गोपिनाथ शिंदे, जालिंदर ढोकणे, सुनिल पानसरे, सुरेश उभदेळ, बाळासाहेब देवखिळे, संजय ङ्गटांगरे, सुखदेव खताळ, ज्ञानदेव वाहाडणे, कैलास बोरावके, आदीच्या सह्या निवेदनावर आहेत.

LEAVE A REPLY

*