…अन्यथा 10 जानेवारीनंतर पुन्हा एसटी कर्मचार्‍यांचा संप !

0

संघटनेचे राज्य सचिव हनुमंत ताटे यांची पत्रकार परिषदेत माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवून एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला. न्यायालयाने आता कर्मचार्‍यांच्या वेतनासह इतर मागण्यांवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली असून, या समितीला 22 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतरही योग्य तोडगा निघाला नाही तर 10 जानेवारीनंतर पुन्हा एसटी कर्मचारी संपावर जातील, असा इशारा मान्यताप्राप्त एसटी संघटनेच्या राज्यव्यापी पदाधिकारी मेळाव्यात देण्यात आला, अशी माहिती संघटनेचे राज्य सचिव हनुमंत ताटे यांनी दिली.
गुरूवारी नगरमध्ये मान्यताप्राप्त एसटी संघटनेचा राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा पार पडला. मेळाव्यासाठी राज्यभरातून अडिच हजार पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना ताटे म्हणाले, एसटीने पहिल्यांदा ऐतिहासिक संप करून एसटीचे सर्वसामान्यांसाठी असणारे महत्व अधोरेखित केले.
एसटी कर्मचार्‍यांना राज्य शासनाचा दर्जा देऊन त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्या मान्य होईपर्यंत हा संप मिटणार नव्हता. परंतु न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत आम्ही संप मागे घेतला. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी उच्चस्तरीय समिती गठित होऊन समितीने वेतनवाढीचा प्रस्ताव सादर करायचा होता.
या प्रस्तावात नवीन कर्मचाजयांना कमीत कमी 18 हजार रूपये वेतनाची तरतूद असावी, अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. याचा अंतरिम अहवाल आता 22 डिसेंबरपर्यंत उच्च न्यायालयातही सादर करायचा आहे. समितीने प्राथमिक अहवाल सादर केला किंवा नाही, याबाबत संघटनेला अद्याप कळविण्यात आलेले नाही.
परंतु वेतनवाढीवर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर पुन्हा 10 जानेवारी 2018 नंतर राज्यभर एसटीचा बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा सर्व पदाधिकार्‍यांनी या मेळाव्यात दिला. यावेळी एसटी संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे, विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस, विभागीय सचिव डी. जी. अकोलकर, शिलाताई नाईकवाडी, उत्तमराव नरसिंग आदी उपस्थित होते.

मेळाव्यातील अन्य ठराव – warning
एसटी कर्मचाजयाला राज्य कर्मचाजयाचा दर्जा देऊन सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. अवैध वाहतुकीला शासनाने बंदी घालावी. संपात सहभागी झाले म्हणून आकसापोटी कर्मचार्‍यांवर करण्यात येणारी कारवाई थांबवण्यात यावी. 

LEAVE A REPLY

*