Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

वरळीत झळकले आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक

Share

मुंबई : वृत्तसंस्था

तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील पहिला आमदार आदित्य ठाकरे यांच्या रूपाने मोठ्या मताधिक्याने निवडणून आला आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ६३ हजार ६७२ मतांनी विजयी झाले.  ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी विजय मिळवत मोठा इतिहासच रचला.

आदित्य ठाकरे यांना काँग्रेसचे ऍड. सुरेश माने व बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांचे आव्हान होते. आदित्य ठाकरेंच्या विजयानंतर वरळीमध्ये भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर झळकले आहेत.

यासोबतच हार्दिक अभिनंदन अशाही आशयाचे फलक याठिकाणी झळकत आहेत.  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या काळात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या घोषणा शिवसेनेने केल्या होत्या. त्यामुळे शिवसेना भाजपाशी युती कायम ठेवणार की नवी समीकरणे जुळवत राष्ट्रवादी, कॉंग्रेसशी हातमिळवणी करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार याबाबत उत्सुकता आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!