Type to search

Featured हिट-चाट

हृतिक-टायगरच्या ‘वॉर’नं मोडले 16 विक्रम

Share

मुंबई : हृतिक रोशन व टायगरच्या श्रॉफच्या वॉर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील कमाईचे अनेक विक्रम मोडले असून यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. वॉरनं आतापर्यंत 265.70 कोटींची कमाई केली आहे. यंदाच्या वर्षात प्रदर्शित झालेल्या अनेक गाजलेल्या चित्रपटांवर वॉरनं मात केली आहे. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाईचा विक्रम वॉरनं मोडला आहे.

आमीर खानचा ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. वॉरनं 51.50 कोटींची कमाई करत त्याला मागे टाकलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत वॉरनं हृतिक रोशनच्या बिग बँग चित्रपटाला मागे टाकलं आहे. बिग बँगनं पहिल्या दिवशी 24.40 कोटींची कमाई केली होती. वॉरनं त्याच्या दुप्पट कमाई केली आहे. टायगर श्रॉफसाठीही हा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा टायगरच्या बागी 2 चा विक्रम वॉरनं मोडला आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या बागी 2नं पहिल्या दिवशी 25 कोटींचा गल्ला जमवला होता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!