मंत्री ना. शिंदे यांच्या वाहनचालकाचे साईमंदिरात पाकीट मारले

0

ना. शिंदे यांचे परिवारासह साईदर्शन

शिर्डी (शहर प्रतिनीधी)- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह मंगळवारी शिर्डीत येवुन साईसमाधीचे दर्शन घेतले. दरम्यान साई मंदिरात ना. शिंदे यांचे वाहनचालक श्री. प्रधान यांचे 10 हजार रूपये असेलेले पाकीट खिशातून चोरट्यांनी लाबविले. यामुळे शताब्दी निमित्त डझनभर पोलीस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या शासनाने साईमंदिरात केल्या आहे. मात्र सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन चोरटे आपला नित्यक्रम उरकत असल्याने पुन्हा एकदा साई मंदिर सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी परीवारासह साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, खा. श्रीकांत शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, तालुकाप्रमुख संजय शिंदे, अमोल गायके, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव आदी उपस्थित होते. यावेळी रावसाहेब खेवरे यांनी ना. एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांचा सत्कार केला.

समाधी शताब्दी वर्षात प्रथमच परीवाराने द्वारकामाईचे दर्शन घेतले. दरम्यान ना. शिंदे यांच्याबरोबर असलेल्या खा. शिंदे यांचे गाडीचे चालक श्री. प्रधान यांचे पैशाचे पाकीट मंदीरातुन चोरट्यांनी लांबविले. प्रधान यांनी सदर वृत्त तातडीने खा. श्रीकांत शिंदे यांना सांगीतले. गेट नंबर दोन बाहेर खा. श्रीकांत शिंदेनी ना. शिंदेना पाकीट मारल्याचे कळविले असता पाच मिनीटे ताफा थांबवुन आपसांत चर्चा करण्यात आली.

श्री. प्रधान यांच्याशी विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले दर्शनासाठी गेट नंबर 2 जवळील प्रवेशद्वारातुन आत गेलो. त्यावेळी गर्दीत पाकीट मारले. पाकीटात दहा हजार रूपये व बँकेचे एटीएम तसेच महत्वाचे ओळखपत्र होते. मात्र मोबाईल सुरक्षीत वाचल्याचे सांगीतले. ना. शिंदे यांनी याविषयी काही न बोलता निघुन जाणे पसंत केले.

साईसमाधी शताब्दीनिमीत्ताने साईमंदीर परीसरातील पाकीटमारी, चैनस्नॅचींग व भक्तांची सुरक्षा आदीसाठी आळा बसावा म्हणुन स्वतंत्र पोलीस उपअधीक्षकाची नेमणुक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक श्री. भोईटे यांची याठिकाणी वर्णी लागली. पाकीटमारी, भक्तांची लुटमार कमी होत नाही. मंदीर परीसरातील मंत्र्याच्या सुरक्षेला भेदुन थेट वाहन चालकांच्या पाकीटावर डल्ला मारायचे धाडस केल्याने खळबळ उडाली. त्यामुळे चोरट्यांचा आत्मविश्वास बळवला असल्याचे या घटनेतुन दिसुन आले.

LEAVE A REPLY

*