Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पावसामुळे भिंत कोसळली; पांढुर्ली येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Share
सिन्नर | वार्ताहर 
गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने पांढुर्ली येथील घराची भिंत कोसळल्याची घटना सोमवारी (दि. 8) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेल्या ज्योती निवृत्ती गवळी (वय 42) या महिलेचा उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.
पांढुर्ली येथील बर्वे वाड्यामागे असणाऱ्या गवळी मळ्यात राहणारे निवृत्ती  गवळी हे पत्नी ज्योती,  मुलगी आरती व मुलगा ऋषिकेश यांच्यासोबत रात्री घरात झोपले होते.
परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे भिजलेल्या भिंतीचा वरचा भाग गवळी कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर कोसळला.
यात ज्योती गवळी यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली तर इतर तिघे किरकोळ जखमी झाले. ज्योती यांना उपचारासाठी धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तेथे प्रकृती सुधारत असताना मंगळवारी दि.9 सकाळी अचानक प्रकृती बिघडून त्यांचे निधन  झाले. या घटनेमुळे परिसरात  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गवळी यांच्या त्या भावजय होत्या.
तहसीलकडून मदतीचा प्रस्ताव
गवळी यांचा मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे झाला असल्याने आज दि10 तहसीलदार राहुल कोताडे यांच्या आदेशावरून महसूल विभागाच्या पथकाने पांढुर्ली येथे भेट देऊन गवळी कुटुंबाचे सांत्वन केले.  तसेच अपघाताबद्दल माहिती घेतली. नैसर्गिक आपत्ती अनुदान योजनेतून गवळी कुटुंबाला मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे चार लाख रुपये भरपाईचा प्रस्ताव तहसीलदारांकडून पाठवण्यात आला आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!