Thursday, May 2, 2024
Homeनाशिक44 वर्षापासून उलटे चालत पायी यात्रा

44 वर्षापासून उलटे चालत पायी यात्रा

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

जाती धर्माच्या नावाखाली जातीयतेचे विष पेरून कोणीही सुखी होणार नाही. असं उलटं काम करणार्‍यांनी सुधारावं असा संदेश देण्यासाठी गेल्या 44 वर्षांपासून थेट गुजरातमधील (gujrat) भरूचहुन शिर्डीच्या (shirdi) साईबाबांच्या (saibaba) दर्शनासाठी उलट पायी चालणारा अवलिया आज सिन्नरला (sinnar) पोहोचला.

- Advertisement -

देवाने फक्त माणसाला जन्माला घातलं. धर्म-जात त्यात माणसाने आणून माणसा-माणसात द्वेष पसरवण्याचे काम होत आहे. हा द्वेष संपवण्यासाठी आपण असे उलटे पायी येत असल्याचे या अवलियाने ‘दै. देशदूत’शी (deshdoot) बोलताना सांगितले. देवाने फक्त माणसाला जन्माला घातले. माणसाने माणसाला हिंदू (hundu), मुस्लिम (muslim), सिख (Sikh), ईसाई (Christian) यासारख्या विविध धर्मात वाटून टाकले.

हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) द्वेष वाढवून आपण काय मिळवतोय? आपला धर्म आपण अनेक बाबा महाराजांमध्ये वाटून टाकला आहे. पूर्वीचे संत कुटीत, झोपडीतच राहायचे. त्यांना कधी महालाचे स्वप्न पडत नव्हते. आताचे बाबा, त्यांना महालात राहता यावे यासाठी माणसा-माणसात, जाती धर्माचा द्वेष पसरवण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राम असो नाही तर रावण, सर्वांनाच रिकाम्या हातीच जग सोडावे लागले हे विसरू नका. कोणीही श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. प्रत्येकाचा डी. एन. ए. म्हणजे त्याचा आत्मा आहे. आत्म्यापासूनच परमात्मापर्यंत प्रवास करता येतो. आपण जन्माला येताना आपल्याला कुठे माहीत असते आपण स्त्री होणार की पुरुष? मानव जातीत जन्माला येणार की प्राणी मात्रेत जन्माला येणार? परमात्मा इथून तिथून एकच आहे. त्यालाच आपण भजायचो. हिंदू धर्मात कधीही व्यक्तीवाद नव्हता. तो सुरू झाला आणि हिंदू धर्मात (Hinduism) अनेक बाबा तयार झाले.

त्यातूनच आपल्या जगण्याची दिशा द्वेषाकडे जात आहे. या द्वेषातून प्रत्येकाला बाहेर काढण्यासाठी, विश्वशांती, व्यसनमुक्ती, सर्वांचे कल्याण व्हावेे यासाठी उलटे चालण्याचे हे अभियान अर्थात जनकल्याण अभियान सुरू केले असल्याचे स्वयं साई गुरुजींचे म्हणणे आहे. आई वडिलांचे संस्कार आणि गुरुजनांचे ज्ञान, मार्गदर्शन मिळाल्यानंतर जाती-धर्माच्या नावाखाली वाढविण्यात आलेला द्वेष स्वीकारायचा की सर्वांचे कल्याण होईल असं जगायचं याचा विचार प्रत्येकाने करावा, यासाठी आपली ही यात्रा असल्याचे ते सांगतात.

यासाठी प्रत्येकाला आतून जागे व्हावे लागेल. आपल्या चेतना जागृत कराव्या लागतील. संपूर्ण मानव जातीला मारक ठरणार्‍या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवावे लागेल. स्वतः सुधारावे लागेल. द्वेषाची उलटी गंगा सध्या देशभरात, जगभरात वाहते आहे. ती पुन्हा सुलटी करावी लागेल. आपण स्वतःच स्वतःचे परमात्मा आहोत ही भावना प्रत्येकात येण्यातच जगाचं कल्याण दडलेले असल्याचे सांगत स्वयंसाई गुरुजी बोलता-बोलता शिर्डीकडे उलटे चालत होते, जवळ येणार्‍या प्रत्येकाला संदेश देत होते.

वर्षातून पाच वेळा चालणे

गुजरातमधील भरूच येथे आश्रम चालवणारे आचार्य स्वयंसाई गुरुजी दरवर्षीप्रमाणे यंदाही साईंच्या दर्शनासाठी निघाले आहेत. वर्षातून रामनवमी, गुरुपौर्णिमा, दसरा, दीपावली व दत्तजयंतीला ते साईच्या दर्शनासाठी येत असतात. उलट्या चालण्यामुळे सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे खिेळतात.

पूर्वी भरुच-शिर्डी अंतर ते सात दिवसात मौनव्रत धारण करत पार करायचे. मात्र, 44 वर्षांच्या या प्रवासाने रस्त्यात त्यांना अनेक मित्र मिळाले. त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी मौन व्रत सोडले. भेटी दरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी थांबणे भाग भाग पडू लागले आणि त्यांचा सात दिवसांचा प्रवासाचा अवधी 18 ते 20 दिवसांपर्यंत गेला.

- Advertisment -

ताज्या बातम्या