अकरावीच्या पहिल्या यादीसाठी विद्यार्थ्यांना ‘प्रतिक्षा‘; यादी नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशीराने जाहीर

0
नाशिक | अकरावी प्रवेशासाठी लागणारी पहिली यादी नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशीराने जाहीर झाल्याने पालकांना तसेच विद्यार्थ्यांना चांगलीच प्रतिक्षा करावी लागली. सकाळपासून यादीची वाट पाहणारया विद्यार्थ्यांनाही या दिरंगाईचा फटका बसला.

नियोजनाप्रमाणे अकरावी प्रवेशासाठी पहिली यादी 10 जुर्ले रोजी संध्याकळी 5 वाजता लागणार होती. परंतु काही केल्याने अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळावर यादी झळकत नसल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्या.

याबाबत उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेतली असता, तांत्रिक गडबडीमुळे यादी जाहीर होण्यास तीन तास उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले. पुण्याहून यादीचे काम सुरू असून रात्री आठ वाजता ती संबंधित वेबसाईटवर दिसेल असे कळविण्यात आले.

परंतु अनेक पालकांना याबाबत माहिती नसल्याने पालक संध्याकाळी चार वाजल्यापासून संबंधित वेबसाईटवर वारंवार भेट देत होते. परंतु यादीच टाकली नसल्याने त्यांचा हिरमोड झाला. अखेर रात्री आठला यादी झळकल्यानंतर विद्यार्थ्यांचा जीव भांडयात पडला.

पहिल्याच यादीला इतका उशीर झाल्यामुळे पालकांची तसेच विद्यार्थ्यांमध्ये थोडे चिंतेचे वातावरण झाले आहे. यंदा प्रथमही ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने काही गडबड तर नाही ना अशी शंका विद्यिार्थ्यांच्या मनात आली.

LEAVE A REPLY

*