Type to search

Breaking News जळगाव

वाघूर धरणाचे आठ दरवाजे 15 सेमीने उघडले

Share

हतनूरमधून 41,666.82 क्यूसेसचा विसर्ग तर आवक मंदावल्याने गिरणातून विसर्ग थांबला

जळगाव (प्रतिनिधी) –

गिरणा प्रकल्पात पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मंदावली असल्याने आज सकाळी धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग थांबवण्यात आला असून वाघूरमधून मात्र 4500 चा तर हतनूर मधून अजूनही चार दरवाजे पूर्ण उघडे असून 44,662.82 क्यूसेकचा विसर्ग करण्यात येत आहे.

वाघूर नदीपात्रा लगतच्या नागरीकांना सावधतेचा इशारा देण्यात आला असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
जिल्हयातील तीनही प्रकल्पांसह मध्यम व लघू प्रकल्प आजमितीस ओव्हरफ्लो झाले असून बहुतांश प्रकल्पामधून विसर्ग केला जात आहे.

जिल्हयातील उणे चिन्हात असलेले अग्नावती प्रकल्प अवघ्या चारच दिवसात पूर्णपणे भरला असून भोकरबारी, मन्याडमधे देखिल नगण्य आवक होत आहे .वाघूरचे आठ दरवाजे उघडले,
जिल्हयातील वाघूर नदीवर असलेल्या प्रकल्पात होत असलेल्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत असल्याने रविवार 22 रोजी 4 दरवाजे उघडून 678 क्यूसेकचा विसर्ग करण्यात येत होता.

त्यात वाढ करण्यात येवून आज सकाळी आठ दरवाजे दरवाजे उघडून 5116 क्युसेकचा विसर्ग करण्यात येत असल्याचे प्रकलप अभियंत्यांनी सांगीतले.

गिरणाचा विसर्ग थांबला
गत सप्ताहात गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पाण्याच्या आवकमुळे प्रकलप 100टक्के भरल्याने मंगळवार 17 रोजी सकाळी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडून 1500 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत होता. त्यात टप्प्याटप्याने वाढ करण्यात आली होती.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!