Type to search

Breaking News जळगाव

वाघूर धरणाचे चार दरवाजे उघडले 

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

जिल्हयातील गिरणा 5000, हतनूर 69517 सह वाघूर 678 क्युसेकचा विसर्ग

जिल्हयातील तीन मोठया प्रकल्पांपैकी गिरणा पाठोपाठ जळगाव शहरानजीक असलेला वाघूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात आवक होत असून शंभर टक्के भरला असून आज रविवार सकाळी चार दरवाजे 5 सें.मी.उघडून 678 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

वाघूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शहरासह तालुका

परीसरातील रब्बी पिकासाठी सोय उपलब्ध झाली असल्याने परीसरात समाधान व्यक्त होत आहे.

शहरपरीसरासह अजिंठा डोंगर परीसरात गेल्या सप्ताहापासून संततधार दमदार पावसाने हजेरी लावल्याने शहरापासून काही कि.मी अंतरावर असलेल्या वाघूर प्रकल्पात पाणीसाठा वाढ होण्यास मदत झाली आहे.

वाघूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या चोविस तासात 35 मिलीमिटर पावसाची नोंद झाली असून 11.53 दलघमी पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून आज रविवार दि.22 रोजी सकाळी जलपूजन करण्यात येवून पाण्याचा विसर्ग करण्यात आला

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!