Type to search

maharashtra जळगाव फिचर्स

‘सावित्रीच्या’ लेकी एकवटल्या ; दारू विक्रेत्यांच्या 3 टपर्‍या जाळल्या

Share

 

रावेर –

वाघोड (ता.रावेर)येथे सहा वर्षांपूर्वी दारू बंदीसाठी आडवी बाटली करून लढा जिंकलेल्या,महिलांच्या यशानंतर देखील अवैध दारू विक्रीचे धाडस करणार्‍या तिघांना दारू विक्री थांबवण्याची विनंती करून देखील उपयोग न झाल्याने,दारू विक्रीने त्रस्त महिलांनी गुरुवारी सायंकाळी तीन टपर्‍या जाळून संताप प्रकट केल्याची घटना घडली.गावात तणाव असून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे महिलांना शांत होण्यासाठी संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवडला आहे.

याबाबत मिळलेली माहिती अशी की,गुरुवारी सायंकाळी गावातील एकवटलेल्या सर्व महिलांनी आंबेडकर चौकात जाऊन दोघांना आता दारू विक्री करू नये,लहान मुले व्यसनाधीन झाली आहे.

यावर विक्रेत्यांनी पुढे दारू विकणार नसल्याचे महिलांना आशवस्त केले.यानंतर महिला गजानन प्रकाश तायडे यांच्या घरी गेल्यावर,विनंती केली असता त्याने महिलांना शिविगाळ केल्याने संतप्त महिलांनी वरील तिघांच्या टपर्‍या पेटवून दिल्याचे पडसाद उमटून आले,

यामुळे गावात खळबळ उडाली असून घटनेनंतर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सपोनि शीतल नाईक,पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन संतप्त महिलांना दारू विक्री करणार्‍यावर कारवाईचे आश्वासन देत शांततेचे आवाहन केले, यावेळी सरपंच शारदा पाटील देखील उपस्थित होत्या.गावात तणाव निवडला असून,राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!