Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वडांगळी : जलशुद्धीकरण केंद्रातून वीजपंप चोरीला

Share

सिन्नर /अजित देसाई

सिन्नरच्या पूर्व भागातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या वडांगळीसह 13 गावे प्रादेशिक योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रामधून अज्ञात चोरट्यानी वीजपंप चोरून नेल्याची घटना घडली.

वडांगळी गावाजवळ सदरचे फिल्टर स्टेशन आहे. मध्यरात्री चोरट्यानी या स्टेशनचे शटरचे कुलूप तोडून चालू स्थितीत असणारा पंप खोलून पोबारा केला आहे.

45 अश्वशक्तीचा हा पंप असून शुक्रवारी दि.19 मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

सकाळी पाणी पुरवठा कर्मचाऱ्याने हा प्रकार पाहिल्यावर योजनेतील गावांच्या सरपंचांना माहिती दिली.

दरम्यान शुक्रवारी दिवसभर आजूबाजूच्या गावांमध्ये चोरीस गेलेल्या पंपाचा शोध घेण्यात येत होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!