Friday, May 3, 2024
Homeनगरवडाळ्याच्या भैरवनाथ मल्टीस्टेटकडून फसवले गेलेल्या ठेवीदारांनी संपर्क साधा

वडाळ्याच्या भैरवनाथ मल्टीस्टेटकडून फसवले गेलेल्या ठेवीदारांनी संपर्क साधा

नेवासा |का. प्रतिनिधी|Newasa

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील मुख्य भैरवनाथ मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयात मुदतठेव रक्कमा जमा केल्या.

- Advertisement -

मात्र मुदतपूर्तीनंतर त्या परत केल्या गेल्या नाहीत अशा ठेवीदारांनी कायदपत्रांसह नगरचय आर्थिक गुन्हे शाखेत हजर रहावे असे आवाहन नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केले आहे.

याबाबत ज्योती गडकरी यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले की, वडाळा बहिरोबा येथील भैरवनाथ मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटीचे चेअरमन सुनील ऊर्फ बाळासाहेब हिरभाऊ मोटे व्हाईस चेअरमन अशोक रभाजी मोटे, मॅनेजर आबासाहेब वसंतराव जाधव यांनी संगनमत करुन मुख्य शाखा वडाळा बहिरोबा तसेच उपशाखा नवीन कायगाव ता. गंगापूर व चांदा येथील शाखा या तीन शाखांमध्ये ठेवीदारांची ठेव रक्कम बचत खाते, आरडी, एफडी मुदतठेव यामध्ये जमा करुन घेवून ठेवीदारांना त्यांच्या गुंतवणूक रकमेच्या मुदतपूर्तीनंतर रक्कम परत न करता आर्थिक गैरव्यवहार व अफरातफर करुन अपहार केला व सभासद व ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केली आहे.

याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 729/2020 भारतीय दंड विधान कलम 420, 406, 120(ब) आदींसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये सदर गुन्हा पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा येथे वर्ग झाला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास चालू आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात ठेवीदार व साक्षीदारांकडे विचारपूस केली असता चेअरमन, व्हाईसचेअरमन, मॅनेजर यांनी गैरव्यवहार, अफरातफर केल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी सदर गुन्ह्याच्या तपासाकामी ज्या ठेवीदारांनी या संस्थेत रक्कमा जमा केल्या परंतु त्या परत मिळाल्या नाहीत त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेत हजर रहावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या