Type to search

Featured राजकीय सार्वमत

कर्जत – जामखेडमध्ये लोकसभेसाठी 61 टक्के मतदान

Share

कर्जत (वार्ताहर)- कर्जत तालुक्यामध्ये काल सर्वत्र अतिशय शांततेने मतदान पार पडले मात्र ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना तालुक्यांमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणावर घडल्या यामुळे त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर देखील परिणाम झाला असून तालुक्यातील सवतडे वस्थी येथे ईव्हीएम मशीन बंद राहिल्याने तिथे 2 तास मतदानाची वेळ वाढवण्यात आली होती या साठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला होता
कर्जत शहरातील एका मतदान केंद्रावर सकाळीच ईव्हीएम मशीन बंद पडले होते तर दुसर्‍या केंद्रावर दुपारी जवळपास पन्नास मिनिट ईव्हीएम मशीन बंद पडले होते तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे जवळपास दीड तास मतदान केंद्रावर बंद होते यावेळी मतदानासाठी आलेले महिला व पुरुष मतदार मतदान केंद्राच्या बाहेर ताटकळत बसून होते तालुक्यामध्ये अशा मशीन बंद पडण्याच्या अनेक घटना घडल्या.

दिव्यांगांसाठी सुविधांचा अभाव
निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या यामध्ये मतदान केंद्रावर व्हीलचेअर्स किंवा अन्य व्यवस्था याशिवाय मतदान केंद्रावर येण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याबाबत सांगितले होते मात्र कर्जत तालुक्यामध्ये बहुतांशी मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर्स दिसून आल्या नाही याचप्रमाणे तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी दिव्यांग हे स्वतःच्या वाहनांमधून नच व्यापारी स्वतः व्यवस्था करून मतदान केंद्राकडे येताना दिसले.

कर्जत तालुक्यामध्ये याचप्रमाणे घरोघरी मतदारांना मतदान केंद्र क्रमांक व मतदानाची सर्व माहिती पोहोच करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली होती परंतु प्रत्यक्षात ही माहिती मतदारांपर्यंत पोहोचलीच नाही असे दिसून आली यामुळे मतदानासाठी आलेले मतदार मतदान केंद्राच्या बाहेर मतदान केंद्र क्रमांक मतदानाचे ठिकाण शोधताना मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते त्यामुळे मतदारांना पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी माहितीसाठी उभारलेल्या केंद्रावर मदत घ्यावी लागल्याचे दिसून आले तसेच अनेक नवीन मतदारांची नावे यादी मध्ये आले नव्हते तर अनेक मतदारांचे यादीतील नावे गायब झाली होती त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर येऊन नावे नसल्याने परत जावे लागत होते यामुळे मनस्तापही सहन करावा लागत होता.

कर्जत शहरांमध्ये सखी मतदान कक्ष
यावेळी निवडणूक आयोगाने प्रत्येक तालुक्यासाठी सखी मतदान कक्ष उभा केले होते कर्जत शहरातील भांडेवाडी येथील मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्र उभा करण्यात आले होते या मतदान केंद्राच्या बाहेर चांगली सजावट व रांगोळी काढण्यात आली होती आलेल्या मतदारांना देखील एक वेगळ्या मतदानाचा अनुभव या ठिकाणी आला या केंद्रावर सर्व महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती.

आठवडी बाजार बंद
कर्जत तालुक्यामध्ये राशीन येथील आठवडे बाजार हा आज मतदानामुळे बंद ठेवण्यात आला होता ग्रामपंचायतीच्या वतीने मागील आठवड्यामध्ये तशी दवंडी गावांमध्ये देण्यात आली होती
मतदान केंद्रावर रांगा
कर्जत तालुक्यामध्ये आज सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सकाळीच मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती यामुळे आर्थिक ठिकाणी रांगा लागल्या होत्या दुपारी मात्र गर्दी कमी दिसून आली पुन्हा सायंकाळी कमी झाल्यानंतर मतदान केंद्राबाहेर पुन्हा रांगा लागल्या होत्या तालुक्यातील मिरजगाव येथिल मतदान केंद्रावर रात्री सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते.

कर्जत तालुक्यातील मतदान आकडेवारी खालीलप्रमाणे
कर्जत कर्जत शहरामध्ये आठ मतदान केंद्र होते यामध्ये आठ हजार 153 मतदारांपैकी 4995 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला शहरांमध्ये 61.5 टक्के मतदान झाले
याशिवाय जोगेश्वर वाडी येथे 839 बर्गेवाडी 471 डेरेमळा 522 नेटकेवाडी 577 वडगाव 886 बेनवडी 750 भांडेवाडी 1734 वालवड 662 धांडेवाडी 643 गायकरवाडी 577, मिरजगाव एकूण मतदान नऊ हजार 586 यापैकी 5345 मतदान झाले कोरेगाव येथे 3404 मतदान झाली.
कर्जत मधील भांडेवाडी येथे सखी मतदान केंद्र निवडणूक आयोगाने प्रथमच उभा केले होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!